शरद पवार यांच्या उपस्थितीत ६ व ७ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 03:43 IST2017-10-13T03:42:51+5:302017-10-13T03:43:05+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत ६ व ७ नोव्हेंबर रोजी कर्जत येथे पक्षाचे जिल्हाध्यक्ष, आमदार, खासदार, जि.प. अध्यक्ष अशा जवळपास ३०० महत्त्वाच्या पदाधिका-यांची बैठक आयोजित केली जाणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

NCP's meeting on 6 and 7 November in the presence of Sharad Pawar | शरद पवार यांच्या उपस्थितीत ६ व ७ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादीची बैठक

शरद पवार यांच्या उपस्थितीत ६ व ७ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादीची बैठक

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत ६ व ७ नोव्हेंबर रोजी कर्जत येथे पक्षाचे जिल्हाध्यक्ष, आमदार, खासदार, जि.प. अध्यक्ष अशा जवळपास ३०० महत्त्वाच्या पदाधिका-यांची बैठक आयोजित केली जाणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
यावेळी देशभरात सध्या असलेले वातावरण व राज्याच्या परिस्थितीवर चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शरद पवार यांच्या उपस्थितीत १५ आॅक्टोबर, रविवारी सकाळी १०.३० वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलची बैठक आयोजित करण्यात आली आहे. राज्यभरातून अनेक डॉक्टर या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

Web Title: NCP's meeting on 6 and 7 November in the presence of Sharad Pawar