शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

राष्ट्रवादीचा २४ जागांचा आग्रह, काँग्रेसचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 14:44 IST

३८ ते ४० जागांवर एकमत झाल्याचा दोन्ही प्रदेशाध्यक्षांचा दावा

मुंबई : सध्या लोकसभेत राष्ट्रवादीचे ५ तर काँग्रेसचे २ खासदार आहेत. त्यामुळे आम्हाला ४८ पैकी २४ जागा द्या, असा आग्रह शुक्रवारी मुंबईत झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी पक्षाने धरला, मात्र काँग्रेस २४ जागा देण्यास तयार नाही. त्यामुळे आजच्या बैठकीत निर्णय झाला नाही. ५ राज्यांच्या विधानसभांचे निकाल ११ डिसेंबरला आहेत. त्यानंतर वाटपावर अंतिम निर्णय होईल, असे सूत्रांनी सांगितले.आमचे ३८ ते ४० जागांवर एकमत झाले आहे. उर्वरित जागांचा प्रश्नही दिवाळीनंतर सोडवला जाईल असे दोन्ही प्रदेशाध्यक्षांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. उर्वरित आठ जागांवर मित्रपक्षांशी चर्चा करुन निर्णय घेतले जातील. १९ नोव्हेंबर पासून हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे, त्याकाळात बैठक होईल व अंतीम शिक्कामोर्तब केले जाईल असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण म्हणाले. राष्ट्रवादीचे आ. जयंत पाटील यांनी देखील हेच सांगितले. ते म्हणाले, मित्रपक्षापैकी खा. राजू शेट्टी, समाजवादी पक्ष, सीपीएम आणि सीपीआय यांच्याशी १९ नोव्हेंबरनंतर बोलणी होईल. त्यांच्यासाठी कोणत्या व कोणी जागा सोडायच्या यावर निर्णय होईल.दिंडोरीची जागा राष्ट्रवादीच्या भारती पवार यांनी लढवली होती. त्या पराभूत झाल्या होत्या. ही जागा आता सीपीयआयने मागितली आहे. तर पालघरची जागा हितेंद्र ठाकूरसाठी काँग्रेसने सोडावी आणि ठाकूर यांनाही आघाडीत घ्यावे असाही आजच्या बैठकीत सूर होता. त्याशिवाय काँग्रेसने अमरावती, अहमदनगर या २ जागा मागितल्या, ज्या राष्ट्रवादीकडे आहेत.राजू शेट्टी यांना हव्यात चार जागाराष्ट्रवादीने २०१४ साली २१ जागा लढवल्या होत्या. या वेळी त्यांनी औरंगाबाद, पुणे, जालना, यवतमाळ व हातकणंगले यापैकी कोणत्याही ३ जागा द्या अशी मागणी केली आहे. हातकणंगलेमधून खा. राजू शेट्टी निवडून आले आहेत. त्यांना कोणाच्या कोट्यातून जागा द्यायची यावर निर्णय झालेला नाही. शिवाय शेट्टी यांनी बुलडाणा, वर्धा, सांगली आणि हातकणंगले हे मतदार संघ मागितले आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtraमहाराष्ट्र