शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

Maharashtra Political Crisis: “धमकी कोणाला देतोय? आमच्या नादाला लागल्यावर आम्ही बैल नांगरसकट लावतो”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 13:17 IST

Maharashtra Political Crisis: सत्तेची मस्ती आणि माज उतरावयला वेळ लागणार नाही. आ देखे जरा किसमें कितना है दम, असा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे.

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नव्या सरकारचे पहिले अधिवेशन आहे. शेतकरी आत्महत्या, ओला दुष्काळ, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अपत्यांचे नाव टीईटी घोटाळ्यात येणे, अशा अनेक मुद्द्यांवरून विरोधक शिंदे सरकारला कोंडीत पकडण्याच्या तयारीत असतानाच भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या एका ट्विटने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

भाजप नेते मोहित कंबोज यांनी, लवकरच पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचा भांडाफोड करणार असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बडा नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना भेटायला जाईल, असा इशारा कंबोज यांनी ट्विटमधून दिला. तसेच २०१९ मध्ये परमबीर सिंग यांनी सिंचन घोटाळ्याची बंद कलेली चौकशी पुन्हा सुरु करण्याची मागणी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच चांगलीच आक्रमक झाली असून, मोहित कंबोज आणि भाजपविरोधात टीकेची झोड उठवली जात आहे. 

आ देखे जरा किसमें कितना है दम

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी मोहित कंबोज यांना थेट इशारा दिला आहे. मोहित कंबोज यंत्रणेला हाताशी धरून धमकी कोणाला देतोय? आमच्या नादाला लागल्यावर आम्ही बैल नांगरसकट लावतो. तुझी सत्तेची मस्ती आणि माज उतरावयला वेळ लागणार नाही. आ देखे जरा किसमें कितना है दम, अशा आशयाचे ट्विट सुरज चव्हाण यांनी केले आहे. 

मोहित कंबोजचीही चौकशी झाली पाहिजे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनीही मोहित कंबोज यांच्यावर टीका केली. मोहित कंबोज यांनीच भोंगे वाटले होते. ते भाजपाचे भोंगे आहेत. शेतकरी, जीसएटीच्या प्रश्नावर बोलताना ते दिसत नाहीत. ईडीच्या दारात बसून त्यांनी ही माहिती मिळवली आहे का? मोहित कंबोजचीही चौकशी झाली पाहिजे. ईडी कोणाच्या घरी धाड टाकेल त्यासंबंधी ट्वीट करत असेल, पत्रकार परिषद घेणार असतील तर हे संशयास्पद आहे. मोहित कंबोज हा कोणाचा कार्यकर्ता, माणूस, कोणाच्या चड्डीचा नाडा आहे सर्वांना माहिती आहे, अशी घणाघाती टीका अमोल मिटकरींनी केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनीदेखील मोहित कंबोज यांचा समाचार घेतला आहे. महाराष्ट्रात पोट भरायला आलेला, महाराष्ट्राला बोट दाखवायला लागला, असे म्हणत रुपाली पाटील यांनी कंबोज यांचा नवा सोमय्या म्हणून उल्लेख केला आहे. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा