शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

Nawab Malik commented on Dhananjay Munde : धनंजय मुंडेंवरील आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

By जयदीप दाभोळकर | Updated: January 13, 2021 12:31 IST

NCP Spokesperson Nawab Malik commented on minister Dhananjay Munde allegation Renu Sharma rape complaint धनंजय मुंडे यांनी स्वत: या संपूर्ण प्रकरणावर मंगळवारी केला होता खुलासा

ठळक मुद्देएका तरूणीनं केला धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोपमुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते NCP आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे Dhananjay Munde यांच्यावर एका तरुणीने बलात्काराचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. बॉलीवूडमध्ये संधी देण्याच्या बहाण्याने मुंडे यांनी आपल्यावर वारंवार अत्याचार केल्याचे सदर तरुणीचा दावा आहे. पोलीस आपली तक्रार दाखल करून घेत नसल्याचे ट्विटही तिने केले आहे. मात्र त्यानंतर सोमवारी (दि. ११) रात्री ओशिवरा पोलिसांनी तरुणीचा तक्रार अर्ज स्वीकारून अधिक तपास सुरू केला आहे. यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक Nawab Malik यांनी प्रतिक्रिया दिली आहे."एखादी तक्रार आल्यानंतर पोलीस निश्चित रूपानं याची चौकशी करणार. ज्या महिला आरोप करत आहेत. त्यांच्या बहिणीशी धनंजय मुंडे यांचं लग्न झालं आहे. त्यांची दोन मुलंही आहेत. त्यांचं नावही मुलांना दिलं आहे. आता त्यांची बहीण पुढे आली आहे. परंतु जे काही आरोप आहेत पोलीस निश्चितचपणे याचा तपास करतील. हा त्यांच्या कुटुंबातील विषय आहे. घरातील काय विषय आहे यावर धनंजय मुंडेच बोलू शकतील. पण त्यांच्या बहीण या धनंजय मुंडेंच्या पत्नी आहेत ही खरी गोष्ट आहे," असं मलिक म्हणाले. "जे काही सत्य असेल त्यावर पोलीस कारवाई करतील. त्यांच्या बहीण या धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहेत हे तक्रारदार महिला सांगत नाहीत. कौटुंबिक विषय असताना जे काही आरोप होतायत त्यावर पोलीस तपास करतील. चौकशीत जे काही सत्य आहे ते समोर येईल," असंही ते म्हणाले. काय आहे प्रकरण ?एखाद्या चित्रपटाचे कथानक असावे अशी ही कहाणी असून स्वत: धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियात यावर सविस्तर खुलासा केल्याने उलट-सुलट चर्चा रंगली आहे. तक्रारदार तरुणी ही पार्श्वगायिका आहे. तिच्या तक्रारीनुसार, मुंडे यांच्याशी तिचा परिचय १९९७ मध्ये इंदूर (मध्यप्रदेश) येथील तिच्या बहिणीच्या घरी झाला. १९९८ मध्ये तिच्या बहिणीशी मुंडे यांचा प्रेमविवाह झाला. २००६ साली बहिण बाळंतपणासाठी इंदूरला गेली असता ती संधी साधून मुंडे यांनी तिच्यावर बलात्कार केला. पुढे दर दोन ते तीन दिवसांनी तिच्यावर अत्याचार सुरू होते. याचे व्हिडीओही त्यांनी काढले. त्यानंतर वारंवार फोन करून प्रेमाची गळ घालण्यास सुरुवात केली. पुढे गायिका होण्यासाठी बड्या सेलिब्रिटी, चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्यांसोबत भेट घालून बॉलीवूडमध्ये संधी मिळवून देण्याचे स्वप्न दाखवत अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तिने १० जानेवारी रोजी याबाबत मुंबई पोलीस आयुक्तांना ऑनलाइन तक्रार दिली. मात्र तक्रारीची दखल घेतली गेली नाही म्हणून तिने मुंबई पोलीस आणि आयुक्तांना ट्विट केले. तिच्या ट्विटमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ ट्विटची दखल घेत, जवळच्या पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देण्यास सांगितले. सोमवारी रात्री ११ वाजता तरुणीचा तक्रार अर्ज पोलिसांनी स्वीकारला. तिचा तक्रार अर्ज स्वीकारल्याच्या वृत्ताला ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांनी दुजोरा दिला.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसnawab malikनवाब मलिकMumbaiमुंबईRapeबलात्कार