शहरं
Join us  
Trending Stories
1
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
2
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
3
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
4
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
5
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
6
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
7
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
8
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
9
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश
10
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
11
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
12
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
13
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
14
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
15
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
16
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
17
ओडिशात नराधमांनी किशोरवयीन मुलीला पेटवले, ७० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर
18
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
19
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
20
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!

शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 10:54 IST

Rohit Pawar Shared Manikrao Kokate Video While Playing Rummy Game: कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज, खेळ थांबा कर्जमाफी द्या, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

Rohit Pawar Shared Manikrao Kokate Video While Playing Rummy Game: नुकतेच विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन झाले. विविध मुद्द्यांवरून हे अधिवेशन गाजले. संजय गायकवाड यांनी कँटिन कर्मचाराऱ्याला केलेली मारहाण, संजय शिरसाट यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ तसेच जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधान भवनात झालेली हाणामारी यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. शेतकरी कर्जमाफी, शेतकऱ्यांचे प्रश्न यावरूनही विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या काही विधानांवरूनही वाद निर्माण झाला होता. यातच आता मंत्री माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी केलेल्या एका विधानाचा आधार घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला असून, यामध्ये कृषिमंत्री माणिकराव कोकाटे मोबाइलमध्ये गेम खेळताना दिसत आहेत. यावरून रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे. रोहित पवार यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. माणिकराव कोकाटे या व्हिडिओत मोबाइलवर पत्ते खेळताना दिसत आहेत. हा व्हिडिओ विधिमंडळ अधिवेशनातील आहे, असे म्हटले जात आहे.

कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज

सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का? अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे. तसेच “#जंगली_रमी_पे_आओ_ना_महाराज…!” #कधी_शेतीवर_या_महाराज #खेळ_थांबा_कर्जमाफी_द्या, असे हॅशटॅगही दिले आहेत.

दरम्यान, वरिष्ठ पातळीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची कसलीच चर्चा नसल्याने असे विलिनीकरण वगैरे कोसो दूर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची कोणतीही चर्चा सुरू नाही. पण, असा काही निर्णय करायचा झाला तरी त्याबाबत भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला विचारावे लागेल. भाजपाच्या नेत्यांनी आम्हाला विचारपूर्वक स्वीकारले आहे. त्यामुळे विलिनीकरणाचे काही निर्णय घ्यायचे झाल्यास त्याची कल्पनाही भाजपाच्या नेत्यांना द्यावी लागेल, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केले होते. हा धागा पकडून रोहित पवार यांनी आता मंत्री माणिकराव कोकाटे, अजित पवार गट आणि महायुती सरकारवर हल्लाबोल केला.

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसManikrao Kokateमाणिकराव कोकाटेAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीfarmingशेती