शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
4
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
5
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
6
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
7
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
8
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
9
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
10
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
11
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
12
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
13
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
14
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
15
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
16
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
17
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
18
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
19
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
20
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

बीडचे पालकमंत्री होऊन अजित पवारांनी संजय देशमुख प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा: बजरंग सोनावणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 12:28 IST

NCP SP Group MP Bajrang Sonawane News: सत्ताधारी पक्षाने सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेला कुठेही राजकारण अथवा जातीय वळण देऊ नये, असे बजरंग सोनावणे यांनी म्हटले आहे.

NCP SP Group MP Bajrang Sonawane News: सरपंच संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती लाभायची असेल तर  त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. या घटनेतला खरा मास्टरमाईंड कोण आहे, त्याला समोर आणले पाहिजे. तीन आरोपी अद्याप फरार आहेत. सत्ताधारी पक्षाने सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेला कुठेही राजकारण अथवा जातीय वळण देऊ नये, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी म्हटले आहे. 

मीडियाशी बोलताना बजरंग सोनावणे म्हणाले की, सहा तारखेला कोणी फोन केला, त्याचे कॉल डिटेल्स काढा. जो चौथा आरोपी आहे त्याचा सीडीआर काढा, मग सर्व मिळेल. नाशिकमध्ये गर्लफ्रेंडला फ्लॅट दिले हे तपास करा. यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करा, आयकर किती भरला हे तपासा आणि प्रशासन यात जबाबदार आहे. जे आरोपी आहेत त्यांचा CDR काढा. आपली पोलीस यंत्रणा त्या बाबतीत तत्पर आहे, यातील मास्टरमाईंड शोधला पाहिजे हीच माझी मागणी आहे. पोलीस अधीक्षकांकडे मागणी आहे की, यातील दोषी पोलिसांचा CDR काढा, कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करा. जिल्ह्यातील पोलिसांच्या बदल्या करा. परळीतील डॉक्टरला विनाकारण गोवले जात आहे, असे बजरंग सोनावणे यांनी म्हटले आहे. 

बीडचे पालकमंत्री होऊन अजित पवारांनी संजय देशमुख प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा

संतोष देशमुख यांच्या अंगावर ५६ जखमा आहेत. त्यांनी असा काय गुन्हा केला होता की त्याला एवढे मारले. ९ तारखेला सरपंचाच्या भावाला कोण कोण बोलले. पीआयला कुणाचे फोन आले हे सगळे सी डी आर मध्ये आहे ते काढा. जिल्ह्याचे पालकमंत्री कुणाला करावे, हा सत्ताधारी पक्षाचा विषय असून तिन्ही पक्ष त्याबाबत निर्णय घेतील. मात्र खरेच या प्रकरणाचा तपास करायचा असेल तर अजितदादा यांच्या राष्ट्रवादी गटाचे जिल्ह्यात तीन आमदार आहेत. त्यामुळे अजितदादांनी या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारावे आणि या प्रकारणाचा सोक्षमोक्ष लावावा, अशी मागणी बजरंग सोनावणे यांनी केली. 

दरम्यान, या प्रकरणी महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते बीड येथे जाऊन कुटुंबीयांची भेट घेत आहे. महाविकास आघाडीचे नेते या प्रकरणी महायुतीवर टीका करत आहेत.  

टॅग्स :bajrang sonwaneबजरंग सोनवणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरण