शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

लाडकी बहीण योजना बंद होणार का? जयंत पाटलांचे सूचक विधान; म्हणाले, “आम्ही सत्तेत आल्यास....”

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 12:59 IST

Maharashtra Assembly Election 2024 Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण योजने’वर होणाऱ्या खर्चावरून महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांकडून टीकास्त्र सोडले जात आहे.

Maharashtra Assembly Election 2024 Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. आचारसंहिता लागू होताच राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. सर्व पक्षांच्या बैठका, जागावाटप, उमेदवार यांबाबतची लगबग सुरू झाली आहे. यातच लाडकी बहीण योजनेबाबत राज्यभरात चर्चा सुरू आहे. या योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. 

लाडकी बहीण योजनेत नोंदणी करण्यात आलेल्या बहि‍णींना सरकारकडून आता ३ हजार रुपयांचा बोनस देण्यात येणार आहे. या योजनेविरोधात विरोधक न्यायालयात गेले आहेत. ही योजना बंद करण्यासाठी विरोधक न्यायालयात गेले आहेत. महाविकास आघाडी आमच्या सर्व योजना बंद करण्याची भाषा करीत आहे. परंतु लाडकी बहीण योजनेचा हात लावला तर याद राखा. त्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे. आमच्या लाडक्या बहिणी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करतील, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सुनावले होते. यानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी या योजनेबाबत सूचक विधान केले आहे. 

आमचे सरकार आल्यास आम्ही...

‘लाडकी बहीण योजने’वर होणाऱ्या खर्चावरून महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांकडून टीकास्त्र सोडले जातेय. आम्ही सत्तेत आल्यावर या योजनेचा आढावा घेऊन ती सुरू ठेवायची की नाही याचा निर्णय केला जाणार असल्याचे काही नेत्यांनी म्हटल्याचे सांगितले जात होते. या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर संकट तयार झाले असून, ही योजना म्हणजे केवळ महिला वर्गास खूश करत मते मिळवण्याचा महायुतीचा डाव असल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. अशातच आमचे सरकार आल्यास आम्ही लाडकी बहीण योजना बंद करणार नाही. उलट दीडऐवजी दोन हजार रुपये आम्ही लाडक्या बहिणींना देऊ, असे जयंत पाटील यांनी सांगितले. ते शिवस्वराज्य यात्रेत बोलत होते. 

दरम्यान, महाराष्ट्र आता सामान्य लोकांच्या हातात द्यायचा की आणखी कोणाच्या हातात द्यायचा. आता या सरकारने रोज एक नवीन योजना आणायला सुरुवात केली आहे. या सरकारने बहिणींसाठी एक योजना आणली आहे. कोणालाही आपल्या बहिणीसाठी आस्था असतेच. बहीण ही आपली जीवा भावाची सर्वात महत्वाची व्यक्ती असतेच म्हणून बहिणीचा सन्मान केला की माझ्यासारख्या आणि तुमच्यासारख्यांना आनंद होतोच. पण, एक गंमत आहे की, यांना दहा वर्षात बहीण आठवली नाही, पाच वर्षे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सरकार होते. तेव्हा यांना बहीण दिसली नाही, नंतरच्या काळात बहीण दिसली  नाही. बहीण दिसली कधी, तर लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात ४८ पैकी ३१ जागा आम्ही जिंकल्या, त्याचा परिणाम असा झाला की यांना बहीण आठवली. त्या आधी यांना बहीण आठवली नव्हती, अशी खोचक टीका शरद पवार यांनी केली होती. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस