शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

“भाजपाबाबत जनतेच्या मनात संताप, लोकसभेला मविआ ३२ ते ३५ जागा जिंकेल”; जयंत पाटलांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 16:08 IST

NCP Sharad Pawar Group Jayant Patil News: एकास एक लढत झाल्यास भाजपाचा पराभव शक्य आहे. सांगलीच्या निर्णयाबद्दल बोलणे योग्य नाही. काही लोकांचे हेतू वेगळे असतात, असे सूचक विधान जयंत पाटील यांनी केले.

NCP Sharad Pawar Group Jayant Patil News: राज्यातील जनतेच्या मनामध्ये भारतीय जनता पक्षाबद्दल संताप आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने लोक वाट बघत असून, त्यांचा कल मतदानातून दिसून येईल. राज्यात महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत असून, लोकसभेला ३२ ते ३३ जागा मिळतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे. 

सांगलीबाबत काँग्रेसच्या नेत्यांनी काय केले, हे बघितले पाहिजे. योग्य लढत व्हावी, हा माझा प्रयत्न आहे. भाजपाविरोधात ताकद एकत्र करण्याचे काम केले पाहिजे. राज्यस्तरीय बैठकांतून काय झाले, हे आता बाहेर सांगणे योग्य होणार नाही. जे लोक वावड्या उठवत आहेत, त्यांनी आत्मचिंतन करावे, एकास एक लढत व्हावी, अशी माझी भूमिका आहे. अर्ज माघारीपर्यंत काहीही होऊ शकते, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. 

सांगलीच्या निर्णयाबद्दल बोलणे योग्य नाही

सांगलीच्या निर्णयाबद्दल बोलणे योग्य नाही. काही लोकांचे हेतू वेगळे असतात, सांगलीबाबत त्या-त्या वेळी सगळं सांगितलं आहे. कोल्हापूरबाबत स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन शाहू महाराजांना उमेदवारी दिली आहे.  सगळ्यांनी एकसंधपणा दाखवला पाहिजे. मतांची विभागणी होऊ नये, असे आमचे मत आहे. विशाल पाटील यांच्या संपर्कात आहे, त्यांच्याशी बोलणार आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. 

दरम्यान, एकास एक लढत झाल्यास भाजपाचा पराभव शक्य आहे. सांगलीबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला असल्याने आता कोणी वेगळी भूमिका घेऊ नये. सांगलीत योग्य लढत व्हावी, यासाठी पुढाकार घेतला होता. एकसंधपणे आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहावे. इतिहासातील वाद नको, भविष्याचा विचार करावा. ही निवडणूक म्हणजे शेवटची नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलMahavikas Aghadiमहाविकास आघाडीNCPराष्ट्रवादी काँग्रेसmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४