शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

'शरद पवारांनी बाप बदलला नाही, ते स्वत: बाप झाले'; जितेंद्र आव्हाडांचा पुन्हा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 23:47 IST

गणेश नाईक यांनी उपस्थित केलेल्या सवालावर जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा प्रत्युत्तर दिले आहे.

नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादीच्या आजी-माजी नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि भाजपा नेते गणेश नाईक यांच्यात चांगलीच जुंपली आहे. बाप बदलणारी औलाद नाही असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी नाईक यांच्यावर जहरी टीका केली होती. 

जितेंद्र आव्हाडांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं होतं. पक्षांतर करणाऱ्या शरद पवारांची गणनादेखील बाप बदलणाऱ्या औलादींमध्ये करणार का, असा सवाल गणेश नाईक यांनी आव्हाड यांना विचारला होता. मात्र आता पुन्हा गणेश नाईक यांनी उपस्थित केलेल्या सवालावर जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा प्रत्युत्तर दिले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत म्हणाले की, शरद पवार यांनी बाप बदलला नसून ते स्वत: बाप झाले. शरद पवार यांचा इतिहास गणेश नाईक यांना कितपत माहिती आहे याची मला कल्पना नाही. परंतु गणेश नाईक किती कृतघ्न आहेत हे त्यांनी त्यांच्या विधानातून दाखवून दिलं आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. तसेच बाप काढल्याचं वक्तव्य तुम्ही केलं. मी बाप काढला नाही. कुठल्यातरी फडतूस पिक्चरचा फडतूस डायलॉग बोलून तुम्ही बाप काढलात. तेव्हा मी खाली घसरलो की तुम्ही खाली घसरलात? हे जरा आठवून बघा असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

मी पक्ष बदलण्याच्या अनुषंगानं जितेंद्र आव्हाडांनी एक वक्तव्य केलंय की पक्ष बदलणाऱ्यांची औलाद आमची नाही. म्हणजे त्यांनी म्हटलंय की बाप बदलणारी औलाद मी नाही. मात्र माणूस पक्ष एकाएकी बदलत नाही. समाजकारणाला, राजकारणाला गती यावी किंवा स्वाभिमान जतन करता यावा, यासाठी माणूस पक्षांतर करतो असं विधान गणेश नाईक यांनी केले होते. तसेच शरद पवारांनी देखील तीनवेळा पक्ष बदलला आहे. मग पवारसाहेबांची गणनादेखील तुम्ही बाप बदलणाऱ्या औलादीमध्ये करणार का, असा थेट सवाल गणेश नाईक यांनी जितेद्र आव्हाड यांना विचारला होता. माणूस गरज म्हणून पक्ष बदलतो. त्यामुळे आव्हाड यांनी अशा प्रकारे खालच्या स्तरावर येऊन भाष्य करू नये असं देखील गणेश नाईकांनी सांगितले होते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारJitendra Awhadजितेंद्र आव्हाडmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीNCPराष्ट्रवादी काँग्रेसGanesh Naikगणेश नाईक