शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

रोहित पवार अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, स्वत: धक्का मारत अपघातग्रस्त कार काढली बाहेर

By मोरेश्वर येरम | Updated: November 19, 2020 13:11 IST

रोहित यांनी तात्काळ धाव घेत रस्त्याच्या खाली गेलेली अपघातग्रस्त कार आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बाहेर काढली.

ठळक मुद्देरोहित पवारांच्या तात्काळ मदतीने अपघातग्रस्तांचे प्राण वाचलेरोहित पवारांच्या सामाजिक बांधिलकीचं होतंय कौतुकसांगलीत एका शेतकऱ्याच्या कारला झाला होता अपघात

सांगलीराष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी सामाजिक भान राखत अपघातग्रस्तांना केलेल्या मदतीमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. रोहित पवार यांच्या सतर्कतेमुळे अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळाली आहे. सोशल मीडियावर रोहित पवारांच्या या कामाचं कौतुक केलं जात आहे. 

सांगलीतील मांडवे-पिंगळी दरम्यान एका शेतकऱ्याच्या कारला अपघात झाला. रोहित पवारही त्याचवेळी या परिसरातून जात होते. रोहित यांनी तात्काळ धाव घेत रस्त्याच्या खाली गेलेली अपघातग्रस्त कार आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बाहेर काढली. त्यानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी नजिकच्या रुग्णालयात पाठविण्यात आले. अपघातग्रस्तांसाठी रोहित पवार देवदूत ठरले. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही.

रोहित पवार अपघातग्रस्त कारला धक्का मारुन बाहेर काढत असतानाचे फोटो व्हायरल झाले. त्यानंतर स्वत: रोहित पवार यांनी घटनेची माहिती देत अशाप्रकारच्या अपघातांसाठी स्वत:हून पुढे येऊन मदत करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असल्याचं म्हटलं. 'पोलीस चौकशीला घाबरुन अनेकदा लोक अपघातग्रस्तांना मदत करत नाहीत आणि त्यामुळे वेळीच मदत न मिळाल्याने अपघातातील जखमींचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे कोणतीही भीती न बाळगता अपघातग्रस्तांना तातडीने मदत केली पाहिजे', असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसroad safetyरस्ते सुरक्षाSangliसांगली