Rohit Pawar : "बोलायचंच असेल तर लखीमपूरचा 'तो' व्हिडिओ बघून तुम्हाला वेदना झाल्या की...", रोहित पवारांचा भाजपावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 10:20 PM2021-10-11T22:20:24+5:302021-10-11T22:25:32+5:30

Rohit Pawar : भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्र बंद फसल्याचा दावा केला आहे. तर अनेक नेत्यांनी बंदमागे महाविकास आघाडीचे राजकारण असल्याचाही आरोप केला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

NCP mla Rohit Pawar hits back to BJP over Maharashtra Bandh Lakhimpur Kheri | Rohit Pawar : "बोलायचंच असेल तर लखीमपूरचा 'तो' व्हिडिओ बघून तुम्हाला वेदना झाल्या की...", रोहित पवारांचा भाजपावर निशाणा

Rohit Pawar : "बोलायचंच असेल तर लखीमपूरचा 'तो' व्हिडिओ बघून तुम्हाला वेदना झाल्या की...", रोहित पवारांचा भाजपावर निशाणा

googlenewsNext

मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ राज्यातील महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंद (Maharashtra Bandh) पुकारला होता. या महाराष्ट्र बंदला राज्यातून संमिश्र प्रतिसाद मिळला. मात्र, राज्यातील भाजपा आणि मनसेने या महाराष्ट्र बंदला विरोध केला. भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्र बंद फसल्याचा दावा केला आहे. तर अनेक नेत्यांनी बंदमागे महाविकास आघाडीचे राजकारण असल्याचाही आरोप केला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. (NCP mla Rohit Pawar hits back to BJP over Maharashtra Bandh Lakhimpur Kheri)

आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून उत्तर दिले आहे. "आपल्या न्याय्यहक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या अन्नदात्यावर अन्याय होत असेल तर त्याविरोधात आवाज उठवायला नको? म्हणूनच आजचा हा बंद आहे. यामुळे कोणत्याही पक्षाला त्रास होण्याचं कारण नाही. काहींना हा बंद राजकीय वाटत आहे. पण ज्यांना ही राजकीय भूमिका वाटत असेल त्यांनी आत्मचिंतन करावं", असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. 

तसेच, "राज्यात व्यापारी, कामगार आणि इतर सर्व घटकांकडून शेतकऱ्यांच्या हिताच्या जपणुकीसाठी या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. हे पाहून सकाळपासूनच भाजपच्या नेत्यांना सलगपणे पत्रकार परिषदा घेऊन बंद अयशस्वी झाल्याचं पुन्हा पुन्हा सांगावं लागत आहे, यातच हा बंद यशस्वी झाल्याचं स्पष्ट होतं", असे रोहित पवार म्हणाले.

याचबरोबर, "शेतकऱ्यांबाबत तुम्हाला तळमळ नसेल पण या बंदला पाठिंबा दिलेल्या घटकांशी बोलून त्यांना याबाबत विचारू शकता. पण बंदला मिळालेलं यश पाहून उगीच आदळआपट करण्यात काहीही अर्थ नाही. बोलायचंच असेल तर लखीमपूरचा 'तो' व्हिडिओ बघून तुम्हाला वेदना झाल्या की काहीच वाटलं नाही, हे तरी एकदा कळू द्या," असंही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

Web Title: NCP mla Rohit Pawar hits back to BJP over Maharashtra Bandh Lakhimpur Kheri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.