शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
3
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
4
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
7
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
8
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
9
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
10
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
11
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
12
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
13
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
14
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
15
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
16
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
17
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
18
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
19
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
20
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय

भाजपाच्या उपटसुंभांचा 'छंद' आपल्याला दिसत नाही का?; रोहित पवार अन् दरेकरांमध्ये जुंपली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 11:58 IST

राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यात आरोप प्रत्योराप सुरू आहेत.

मुंबई-

राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यात आरोप प्रत्योराप सुरू आहेत. चंद्रकांतदादांवर टीका करण्याइतके रोहित पवार मोठे झालेले नसल्याचं वक्तव्य दरेकर यांनी केलं होतं. त्यावर आज रोहित पवार यांनी शेकल्या शब्दांत दरेकरांनाच सवाल विचारला आहे. "पवार साहेबांच्या राजकीय कारकिर्दीएवढंही वय नसलेल्या भाजपातील काही उपटसुंभांचा साहेब व इतर नेत्यांविषयी खालच्या पातळीवरची भाषा वापरण्याचा 'छंद' आपल्याला दिसत नाही का?", असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. 

"दरेकर साहेब वयाचा विचार करायचा तर आदरणीय पवार साहेबांच्या राजकीय कारकिर्दीएवढंही वय नसलेल्या भाजपातील काही उपटसुंभांचा साहेब व इतर नेत्यांविषयी खालच्या पातळीवरची भाषा वापरण्याचा 'छंद' आपल्याला दिसत नाही का? अशांना महत्त्व देत नाही, पण ते गरळ ओकताना भाजपचे मोठे नेते का गप्प बसतात?", असा खरमरीत सवाल उपस्थित करत रोहित पवार यांनी दरेकरांना उत्तर दिलं आहे. 

"मोठ्या नेत्यांना सल्ला देणं/त्यांच्यावर हल्ला करण्याएवढा मी मोठा नसल्याची मला जाणीव आहे. पण राज्यातील तुमच्या पक्षातील मोठ्या नेत्यांकडून राजकीय समंजसपणाची अपेक्षा करणं काही गैर नाही. कारण मोठे नेतेच चुकीचं वागले तर त्याचं अनुकरण लहानही करत असतात", असंही रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे. त्यापुढे जात रोहित पवारांनी राजकीय संस्कृती जपण्याचाही सल्ला दरेकरांना देऊ केला आहे. "हेच मोठे नेते चुकीचं समर्थन करत असतील तर महाराष्ट्रात आजवरच्या नेत्यांनी निर्माण केलेल्या सुसंस्कृत राजकारणाच्या परंपरेला तडा जाण्याचीही भीती वाटते. महाराष्ट्राप्रमाणे देशात इतरत्र कुठंही दिसत नसलेली ही राजकीय संस्कृती खरंतर आपण सर्वांनीच जपायला हवी", असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. 

दरेकर नेमकं काय म्हणाले होते?"रोहित पवार अजून लहान आहेत. चंद्रकांतदादांवर वार करायला मोठे पवार आहेत. त्यानंतर अजित पवार आहेत. त्यामुळे त्यांनी इतक्यात प्रदेशाध्यक्षांवर टीका करण्याची किंबहुना सल्ला देण्याची घाई करू नये. रोहित पवार हल्ली आपल्या क्षमतेपेक्षा जास्त मोठ्या नेत्यांवर टीका-टिप्पणी करुन बुजूर्गपणाचा आव आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे", असं प्रवीण दरेकर म्हणाले होते. 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसpravin darekarप्रवीण दरेकरBJPभाजपाSharad Pawarशरद पवार