शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

काल आपल्या शास्त्रज्ञांनी चंद्रावर झेप घेतली, आज भारतीय 'कुस्ती' मातीला मिळाली - आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 19:41 IST

जागतिक कुस्ती फेडरेशननं भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता रद्द केल्यानं राजकारण तापलं आहे.

जागतिक कुस्ती महासंघानं भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता रद्द केल्यानं राजकारण तापलं आहे. विरोधकांनी सत्ताधारी भाजपावर टीका करताना खासदार ब्रीजभूषण शरण सिंह यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. जागतिक कुस्ती महासंघाच्या या निर्णयामुळं भारतीय कुस्तीला मोठा धक्का बसला आहे. कारण आगामी काळात भारतीय शिलेदार आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळणार आहेत. खरं तर जागतिक कुस्ती महासंघानं ३० मे रोजी भारतीय कुस्ती महासंघाला पत्र लिहून पूर्वसूचना दिली होती की, येत्या ४५ दिवसांत भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक न झाल्यास महासंघाच्या सदस्यत्वाला स्थगिती दिली जाईल. 

देशातील नामांकित महिला कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष आणि विद्यमान खासदार ब्रीजभूषण सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सिंह यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना निलंबित करून ADHOC समितीची स्थापना केली होती. पण, निवडणूक लांबल्याने आता भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता रद्द करण्यात आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सडकून टीका केली आहे.

"ब्रिजभूषण आणि त्याला संरक्षण देणाऱ्यांची पापं भोवली"आव्हाड यांनी ब्रीजभूषण यांचा दाखला देत म्हटलं, "जागतिक कुस्ती फेडरेशनकडून भारतीय कुस्ती फेडरेशनची मान्यता रद्द. ब्रिजभूषण आणि त्याला संरक्षण देणाऱ्यांची पापं भोवली. काल आपल्या शास्त्रज्ञांनी चंद्रावर झेप घेतली, आज भारतीय कुस्ती मातीला मिळाली."

दरम्यान, जवळपास दीड महिने देशातील नामांकित पैलवान ब्रीजभूषण सिंह यांच्याविरोधात आखाड्याबाहेरील कुस्ती लढत होते. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पैलवानांनी आंदोलन मागं घेतलं होतं.  

टॅग्स :brij bhushan sharan singhब्रिजभूषण शरण सिंहJitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा