शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांचा शिवसेनाप्रवेशाचा आग्रह; आमदार सोपल म्हणाले आठ दिवसांचा वेळ द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 18:09 IST

गेल्या काही दिवसांपासून आमदार सोपल हे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा पहायला मिळत होती.

मुंबई - विधानसभा निवडणुकीला अवघ्या तीन महिन्यांचा काळ शिल्लक राहिला आहेत. मात्र त्यापूर्वी भाजप-शिवसेनेने फोडाफोडीचे राजकरण करत, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांना पक्षप्रवेश देण्याचा धडाका लावला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरु असताना, सोपल यांनी निर्धार मेळावा घेत आठ दिवसातच निर्णय घेण्याच्या खुलासा केला आहे. त्यामुळे सोपल हे पक्षप्रवेशाच्या बाबतीत काय  निर्णय घेणार, याची  चर्चा राजकीय वर्तुळात पहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून आमदार सोपल हे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा पहायला मिळत होती. तसेच राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला सुद्धा त्यांनी दांडी मारली होती. त्यातच सोपल यांनी आता आपल्या कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी सोपल यांना शिवसेनेत जाण्याचा आग्रह केला. कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर त्यांनी आठ दिवसांचा कालवधी द्या असे भावनिक आवाहन आमदार सोपल यांनी केले आहे.

आमदार सोपल हे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखे जातात. सोपल हे बार्शी मतदारसंघात १९८५ पासून २००४ सोडले तर सलग पाच वेळा निवडणून आले आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी विविध मंत्रालयांची जवाबदारी सांभाळलेली आहे. त्यामुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशाने राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का बसणार आहेत.

युतीच्या नियमानुसार बार्शी हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहेत. त्यातच सेनेतून विधानसभा उमेदवारीसाठी हक्क गाजवणारे माजी आमदार राजा राऊत हे आता भाजपमध्ये गेले असल्याने, आमदार सोपल यांचा मोर्गे मोकळा झाला आहे. त्यामुळे सेनेत गेल्यावर त्यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे. त्यामुळे आठ दिवसांनी आमदार सोपल काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.