शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचं होणार 'कल्याण'; महाआघाडीसोबत इंजिन धावणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 18:15 IST

राष्ट्रवादी स्वत:च्या कोट्यातील कल्याणची जागा मनसेसाठी सोडणार; सूत्रांची माहिती

मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. भाजपा आणि शिवसेनेची युती झाल्यानंतर इतर पक्षांना सोबत घेण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीनं जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसनं भारिप बहुजन महासंघाला सोबत घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केले असताना राष्ट्रवादीनं मनसेची साथ मिळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मनसे महाआघाडीत आल्यास त्यांना कल्याणची जागा दिली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे प्रमुख राज ठाकरे पुण्यातील एका कार्यक्रमात एकत्र होते. त्यावेळी राज यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली होती. त्यानंतर या दोन नेत्यांमधील जवळीक कायम चर्चेत राहिली. आता मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादीनं जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी कल्याणची जागा मनसेसाठी सोडण्याची तयारी दाखवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे यासाठी राष्ट्रवादीनं काँग्रेसलादेखील गळ घातली आहे. शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यानंतर राष्ट्रवादीनं स्वत:च्या कोट्यातील कल्याणची जागा मनसेसाठी सोडल्याची माहिती मिळते आहे. या ठिकाणी मनसेचे राजू पाटील किंवा त्यांचे भाऊ रमेश पाटील यांना उमेदवारी मिळू शकते. मात्र मनसेला आणखी एक जागा हवी आहे. यासाठी राष्ट्रवादीची काँग्रेससोबत चर्चा सुरू आहे. याचा निर्णय सोमवारपर्यंत होऊ शकतो. मनसेला सोबत घेण्याबद्दल काँग्रेस पक्ष तितकासा अनुकूल नाही. महाराष्ट्रात मनसेला सोबत घेतल्यास त्याचा सर्वाधिक फटका उत्तर प्रदेशात बसेल, असं पक्षाच्या नेत्यांना वाटतं. मनसेची उत्तर भारतीयांच्या विरोधातली भूमिका पक्षासाठी अडचणीची ठरू शकते. काँग्रेसला होणारं उत्तर भारतीय मतदान कमी होऊ शकतं, असं पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना वाटतं. मात्र मोदी विरोधकांनी एकत्र येण्याचं आवाहन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केलं होतं. त्यामुळे मनसेचं इंजिन आघाडीसोबत धावणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRaj Thackerayराज ठाकरेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९MNSमनसेBJPभाजपाShiv Senaशिवसेनाkalyanकल्याण