Nawab Malik: राष्ट्रवादी नेते कारवायांना घाबरणार नाहीत; नवाब मलिकांचा भाजपावर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 09:59 AM2021-11-02T09:59:54+5:302021-11-02T10:00:21+5:30

Nawab Malik Reaction on Anil Deshmukh, Ajit Pawar Action: ज्यांनी हा आरोप लावला तोच फरारी आहे. ते बेल्जियममध्ये असल्याचं सांगितलं जातं. लुकआऊट नोटीस असताना ते बाहेर कसे गेले? असा सवाल नवाब मलिकांनी केला आहे.

NCP leaders will not afraid of action; Nawab Malik target BJP over Ajit Pawar, Anil Deshmukh Action | Nawab Malik: राष्ट्रवादी नेते कारवायांना घाबरणार नाहीत; नवाब मलिकांचा भाजपावर घणाघात

Nawab Malik: राष्ट्रवादी नेते कारवायांना घाबरणार नाहीत; नवाब मलिकांचा भाजपावर घणाघात

googlenewsNext

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई केली आहे. १३ तासांच्या चौकशीनंतर ईडीनं अनिल देशमुखांना अटक केली आहे. तर आयकर विभागाने अजित पवारांशी निगडीत ५ मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. जवळपास १ हजार कोटींची ही संपत्ती आहे. राष्ट्रवादी नेत्यांवर झालेल्या या कारवाईनंतर पहिल्यांदाच पक्षाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते कारवायांना घाबरणार नाहीत असा इशारा मंत्री नवाब मलिकांनी भाजपाला(BJP) दिला आहे.

याबाबत मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) म्हणाले की, राजकीय सूडबुद्धीने अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर कारवाई करण्यात आली. परमबीर सिंग(Parambir Singh) यांनी सचिन वाझेच्या माध्यमातून शहरात वसुलीचं रॅकेट चालवलं. जेव्हा ही गोष्ट बाहेर आली तेव्हा परमबीर सिंग यांची बदली तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. त्यानंतर परमबीर सिंग यांनी १०० कोटींचा कथित वसुली करण्याचं टार्गेट दिल्याचा आरोप केला. ज्यांनी हा आरोप लावला तोच फरारी आहे. ते बेल्जियममध्ये असल्याचं सांगितलं जातं. लुकआऊट नोटीस असताना ते बाहेर कसे गेले? परमबीर सिंग यांना संरक्षण कुणी दिले? रस्ते, समुद्री आणि हवाई मार्गाने ते पळून गेले असतील तर त्याची जबाबदारी केंद्र सरकारवर आहे असा आरोप त्यांनी केला.

तसेच केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन राज्यातील महाविकास आघाडी सरकारला बदनाम करणे, मविआ नेत्यांना त्रास देण्यासाठी केला जात आहे. भाजपा या यंत्रणेचा वापर करुन लोकांवर दबाव निर्माण करण्याचं काम करते. त्याचं उत्तर राज्यातील जनतेला द्यायला लागेल. दुसऱ्याच्या मालमत्तेवर धाड टाकून ती अजित पवारांच्या नावाने जोडली जाते. अजित पवारांच्या नोकराची, ड्रायव्हरची मालमत्ता नाही. अजित पवारांना बदनाम करण्याचं डाव रचला जात आहे. छगन भुजबळ यांच्याविरोधातही असेच आरोप झाले. परंतु कोर्टाने महाराष्ट्र सदनात काही भ्रष्टाचार झाला नाही असं सिद्ध केले. महाराष्ट्रातील नेत्यांना बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे. निवडणुकीपूर्वीही असेच राजकारण करुन पक्षांतर घडवून आणली. प्रशासकीय यंत्रणांना हाताशी धरुन राजकीय डाव खेळले जातात. परंतु राष्ट्रवादी त्याला घाबरणार नाही असं मंत्री नवाब मलिकांनी स्पष्टपणे सांगितले आहे.  

Web Title: NCP leaders will not afraid of action; Nawab Malik target BJP over Ajit Pawar, Anil Deshmukh Action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.