..अन्यथा फडणवीस साहेब वेडेवाकडे जन्माला आले असते: रुपाली चाकणकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 17:40 IST2019-08-26T17:33:28+5:302019-08-26T17:40:48+5:30
मुख्यमंत्री यांच्या महाजनादेश यात्रेचे काळे झेंडे दाखवून स्वागत होत आहे.

..अन्यथा फडणवीस साहेब वेडेवाकडे जन्माला आले असते: रुपाली चाकणकर
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी पक्षाकडून शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली असून आज ही यात्रा उस्मानाबाद जिल्ह्यात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. आघाडी सरकारने काय केले म्हणणाऱ्या फडणवीस यांना आमच्या सरकारने पोलियो डोस पाजले नसते तर ते वेडेवाकडे जन्माला आले असते. असा खोचक टोला चाकणकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लगावला.
चाकणकर पुढे म्हणाल्यात की, मुख्यमंत्री यांच्या महाजनादेश यात्रेचे काळे झेंडे दाखवून स्वागत होत आहे. फडणवीस सरकारच पाच वर्षात पापाचा घडा एवढा भरला आहे,की त्यांना जनते समोर जाताना भीती वाटत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने गेल्या ७० वर्षात काय केलं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना जर आघाडीच्या सरकारने पोलिओचा डोस दिला नसता, तर ते वेडेवाकडे जन्माला आले असते. अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली.
राज्यात महिलांच्या अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. राज्यातील सर्वात अपयशी गृहमंत्री म्हणून फडणवीस ठरले आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा होता. लोकांमध्ये जायला मुख्यमंत्र्यांना भीती वाटते. त्यामुळे ते आपल्या यात्रा पोलीस बंदोबस्तात काढत असल्याचा आरोप सुद्धा चाकणकर यांनी यावेळी केला.