“लवकरच घरी जेवायला या, काहीतरी स्पेशल करते;” सुप्रिया सुळेंचं चंद्रकांत पाटलांना खास आमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 14:19 IST2022-07-30T14:18:24+5:302022-07-30T14:19:41+5:30
Supriya Sule On Chandrakant Patil : सुप्रिया सुळे यांनी चंद्रकांत पाटलांना दिलं खास आमंत्रण.

“लवकरच घरी जेवायला या, काहीतरी स्पेशल करते;” सुप्रिया सुळेंचं चंद्रकांत पाटलांना खास आमंत्रण
Supriya Sule On Chandrakant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी घरी जेवायला येण्याचं खास आमंत्रण दिलं आहे. झी मराठीवर येणाऱ्या सुबोध भावे यांच्या बस बाई बस या कार्यक्रमात सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या. यावेळी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी दिलखुलासपणे उत्तरं दिली. याचदरम्यान त्यांनी चंद्रकांत पाटलांना घरी जेवायला येण्याचं आमंत्रणही दिलं.
पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान चंद्रकांत पाटलांनी सुप्रिया सुळेंना घरात लक्ष द्यावं असं म्हटलं होतं. त्या वर सुप्रिया सुळे यांनी बोलताना हसत उत्तर दिलं. “घरी वहिनींना सांगा मी विचारलं आहे आणि लवकर घरी जेवायला या. तुमच्यासाठी स्पेशल काहीतरी करते,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. माझे सर्व पक्षीय लोकांशी संबंध चांगले आहेत, असंही त्या म्हणाल्या. सुबोध भावे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी चंद्रकांत पाटलांना घरी आमंत्रित केलं.
यावेळी सुप्रिया सुळे यांना घरी काम करण्याचा त्यांनी दिलेल्या सल्ल्याबद्दल प्रशअन विचारण्यात आला. “मला त्याचं फार काही वाटलं नाही. मी एक महिला आहे. होममेकर असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. स्वयंपाक करण्याला मी कमीपणा समजत नाही. विरोधक जे बोलतात ते मनाला लावून घेत नाही,” असंही त्या म्हणाल्या.