शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Rohit Pawar “खालच्या पातळीवर जाऊन गरळ ओकणाऱ्या काही अघोषित प्रवक्त्यांना भाजपने आतातरी वेसण घालावी”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 17:56 IST

Leader Rohit Pawar targets BJP over Prophet Muhammad comment spoke person Saudi Arabia Qatar राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांचं वक्तव्य. अरब देशातील कचराकुंडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे अरबी देशातील कतार आणि कुवेतने तेथील भारतीय दुतावासाला माहिती दिली. तसंच, या वक्तव्याविरोधात निषेधही व्यक्त केला आहे. कतारच्या परराष्ट्रमंत्रालयाने दोहा येथे भारतीय राजदूत दिपक मित्तल यांना याबाबत माहिती दिली. एकीकडे हा वाद सुरू असताना आता अरब देशातील कचराकुंडीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, यावरून आता भारतातूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. 

“राजकीय विरोधक असले तरी नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांचा फोटो वाईट पद्धतीने पाहण्याची वेळ भाजपच्या मोकाट प्रवक्त्यांनी आणलीय. तसंच आखातातील भारतीयांची अडचण होत असून भारतीय मालावर बहिष्कार टाकला जातोय. हा देशाचा अवमान असून यामुळं प्रत्येक भारतीय संतप्त आहे,” असं रोहित पवार  Leader Rohit Pawar म्हणाले. या प्रकरणी त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली. “विशेष म्हणजे राज्यातही असे अनेक बेताल लोक आहेत.. किंबहुना त्यांच्या या 'लाय...'मुळंच भाजपने त्यांची भरती केलीय. देशाची मान खाली घालायला लावणाऱ्या या घोषित आणि खालच्या पातळीवर जाऊन गरळ ओकणाऱ्या काही अघोषित प्रवक्त्यांना भाजपने आतातरी वेसण घालावी,” असंही ते म्हणाले.

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारNarendra Modiनरेंद्र मोदीNCPराष्ट्रवादी काँग्रेसsaudi arabiaसौदी अरेबिया