शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

“शरद पवारांनी मराठा आणि धनगर आरक्षणासाठी दिल्लीत वजन वापरावं”: रोहित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 14:48 IST

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या राज्यात धार्मिक आणि जातीभेद नव्हता. आताच्या राजकारण्यांनी त्यांच्याकडून शिकवण घ्यावी, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.

अहमदनगर: आताच्या घडीला राज्यात ओबीसी आरक्षणावरून राजकारण तापलेले दिसत आहे. ओबीसीसह धनगर समाजालाही आरक्षण मिळणेबाबत जोरदार मागणी पुढे होऊ लागली आहे. दोन्ही समाजातील नेते मंडळी यासाठी आग्रही असल्याचे दिसत आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते, शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्रात आपले वजन वापरावे आणि मराठा तसेच धनगर आरक्षणाचा मार्ग सुकर करावा, अशी विनंती केली आहे. 

जामखेड तालुक्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवार, मंत्री धनंजय मुंडे, आमदार रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, आमदार उपस्थित होते.

मराठा आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या पण सध्या जीर्ण झालेल्या वास्तूंचा सरकारने जीर्णोद्धार करावा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राला जादा निधी द्यावा. तसंच आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा वाढविण्यासाठी शरद पवार यांनी आपले वजन वापरून केंद्र सरकारकडे प्रयत्न करावेत. त्यामुळे मराठा आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. चौंडीतील आजच्या अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमाचा मी संयोजक नाही, कार्यक्रम समितीने आयोजित केला आहे, मी केवळ एक कार्यकर्ता आहे. 

राजकारण्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्याकडून शिकवण घ्यावी

देशात १३० पेक्षा जास्त मंदिरे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधली, महिलांची सोय व्हावी यासाठी कित्येक ठिकाणी नदीवर घाट बांधले. दुष्काळात मंदिर किंवा घाट बांधण्याचे काम करून त्यांनी रोजगारही उपलब्ध करून दिला. अहिल्यादेवींच्या राज्यात धार्मिक आणि जातीभेद नव्हता. हल्लीच्या राजकारण्यांनी त्यांच्याकडून ही शिकवण घ्यावी, असा टोला लगावत मागील पाच वर्षांत चौंडीतील विकास कामे थांबली होती. गेल्या दोन वर्षांत ती पुन्हा मार्गी लागली. भविष्यात चौंडीत अहिल्यादेवींचे संग्रहालय उभारण्याचे नियोजन आहे, असा मानस रोहित पवार यांनी बोलून दाखवला.

दरम्यान, रोहित पवार या तरुणाच्या हाती सत्ता दिली, याचा आनंद आहे. महाराष्ट्रात दुष्काळ पडला त्यावेळी कर्जत-जामखेड तालुक्यातही मोठा दुष्काळ पडला होता. येथील दुष्काळ हे जुने दुखणे आहे. या तालुक्यातील दुष्काळ पाहण्यासाठी शेजारच्या अकोले गावात दुष्काळ पाहण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आल्या होत्या. त्यांनी येथील दुष्काळाची स्वत: पाहणी केली. मात्र दुर्दैवाने त्यावेळेपासून आजपर्यंत येथील दुष्काळ हटला नाही. पाण्याचा, उद्योगाचा प्रश्न सुटला नाही. मला सांगायला आनंद होत आहे की, रोहित पवार यांनी या भागात पाणी, उद्योगाचे प्रश्न सोडविले, असे कौतुक शरद पवार यांनी केले आहे.  

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणDhangar Reservationधनगर आरक्षणRohit Pawarरोहित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस