शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

भाजप सरकार असताना अशाच प्रकारे अहवाल तयार होत होते का; रोहित पवारांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 15:26 IST

रोहित पवार (rohit pawar) यांनी अप्रत्यक्षरित्या देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांना टोला लगावला आहे.

ठळक मुद्देरोहित पवार यांची भाजपवर टीकाफोन टॅपिंग प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप सुरूचरोहित पवार यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अनेकविध प्रकरणांवरून महाविकास आघाडी सरकार आणि भाजपसह अन्य पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. राजकीय वातावरण ढवळून निघताना पाहायला मिळत आहे. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी फोन टॅपिंग प्रकरणातील अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला. मात्र, हा अहवाल कुंटे यांनी तयार केलाच नसावा, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी म्हटले होते. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (rohit pawar) यांनी अप्रत्यक्षरित्या फडणवीस यांना टोला लगावला आहे. (ncp leader rohit pawar criticised bjp over phone tapping issue)

रोहित पवार यांनी एकामागून एक अशी दोन ट्विट करत भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. “राज्याच्या मुख्य सचिवांनी दिलेला अहवाल मंत्र्यांनी तयार करून त्यावर मुख्य सचिवांनी केवळ स्वाक्षरी केल्याचे काही 'अनुभवी' नेत्याचं म्हणणे आहे. म्हणून भाजप सरकार असताना अशाच प्रकारे अहवाल तयार होत होते का,असा प्रश्न मला पडला. पण हे सरकार व मुख्य सचिव असं करणार नाही याची खात्री आहे”, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे. 

सरकारला बदनाम करण्यासाठीच 'फोन टॅपिंग'चं षडयंत्र

मुख्य सचिवांच्या अहवालातील अनेक बाबी धक्कादायक आहेत. मविआ सरकारला बदनाम करण्यासाठीच 'फोन टॅपिंग'चं षडयंत्र रचण्यात आलं काय, अशी शंका या अहवालावरून येतेय. तसंच अधिकाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय गोळ्या झाडण्याची अशी प्रथा पडली तर भविष्यात प्रशासनाला काम करणंही अवघड होईल, असे रोहित पवार यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

‘‘नवनीत राणा यांनी आवाज उठवयला हवा होता, दीपाली चव्हाणचा जीव वाचला असता’’

दरम्यान, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जो अहवाल दिला, तो त्यांनी तयारच केलेला नाही. मी त्यांना ओळखतो, ते सरळमार्गी आहेत. हा अहवाल कदाचित जितेंद्र आव्हाड किंवा नवाब मलिक यांनी तयार केला असावा आणि त्यावर मुख्य सचिवांनी स्वाक्षरी केली असावी, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणRohit Pawarरोहित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाRashmi Shuklaरश्मी शुक्ला