नवाब मलिक अडकले! ईडीकडून न्यायालयात आरोपपत्र दाखल; गेल्या महिन्यात जामिनही राखून ठेवलेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 22:46 IST2023-07-10T22:46:22+5:302023-07-10T22:46:37+5:30
विशेष सरकारी वकील सुनील गोन्साल्विस यांनी विशेष न्यायाधीश आर एन रोकडे यांच्यासमोर आरोपांचा मसुदा सादर केला.

नवाब मलिक अडकले! ईडीकडून न्यायालयात आरोपपत्र दाखल; गेल्या महिन्यात जामिनही राखून ठेवलेला
फरारी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांशी संबंधित पैशांच्या अफरातफर प्रकरणी ईडीने राष्ट्रवादीचे माजी मंत्री नवाब मलिक आणि अन्य तिघांविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
विशेष सरकारी वकील सुनील गोन्साल्विस यांनी विशेष न्यायाधीश आर एन रोकडे यांच्यासमोर आरोपांचा मसुदा सादर केला. यामुळे नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणात अन्य तीन आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले होते आणि या प्रकरणाची सुनावणी 24 जुलै रोजी ठेवण्यात आली आहे.
हे फौजदारी खटल्यातील खटला सुरू करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून प्रथमदर्शनी पुराव्याच्या आधारे तपास यंत्रणा आरोपींवर कोणती कलमे लावू शकतात याचा निर्णय न्यायालय घेणार आहे. यानंतर न्यायालय आरोपीला खटल्यादरम्यान त्याच्यावर लावलेल्या आरोपांचे वाचन करेल व त्यानंतर खटला सुरु होईल.
६५ वर्षीय मलिक यांनी आपण किडनीच्या आजाराने ग्रस्त असल्याने आपली तात्काळ वैद्यकीय जामिनावर सुटका करावी, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली होती. मलिक गेल्या वर्षीपासून रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची जामिनावर सुटका करावी, असा युक्तिवाद वकिलांनी केला होता. परंतू, गेल्या महिन्यात एकलपीठाने जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवला होता.