शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

'ब्लू टीक' पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे जास्त लक्ष द्या; राष्ट्रवादी काँग्रेसची मोदी सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 14:23 IST

Twitter Blue Tick : यापूर्वी ट्विटरनं उपराष्ट्रपती आणि सरसंघचालकांच्या ट्विटरवरील 'ब्लू टीक' काढली होती. काही वेळानं पुन्हा 'ब्लू टीक' करण्यात आली होती बहाल.

ठळक मुद्देयापूर्वी ट्विटरनं उपराष्ट्रपती आणि सरसंघचालकांच्या ट्विटरवरील 'ब्लू टीक' काढली होती. काही वेळानं पुन्हा 'ब्लू टीक' करण्यात आली होती बहाल.

केंद्र आणि ट्विटर यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला असून, त्याचा नवा अंक शनिवारी पाहायला मिळाला. सरकारने नोटीस बजावली असतानाच ट्विटरनेही उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक भाजप व आरएसएस नेत्यांच्या ट्विटर अकाउंटची "ब्लू टीक" काहीकाळ हटवून पुन्हा बहाल केली. या प्रकरणावरून विरोधकांनी केंद्रावर टीका केली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसनंही भाजपवर निशाणा साधला आहे. 'ब्लू टीक' आणि लसीकरण यातील फरक पहिल्यांदा केंद्रसरकारने समजून घ्यावा असे सांगतानाच 'ब्लू टीक' पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे जास्त लक्ष द्यावा असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला लगावला आहे. "ट्विटरवर संपूर्ण भाजप आणि केंद्रसरकार 'ब्लू टीक' ची लढाई लढताना दिसत आहे तर दुसरीकडे देशातील जनता लसीकरणाची लढाई लढत आहे," असे नवाब मलिक यांनी सांगितले. ट्विटरवरील 'ब्लू टीक' असेल किंवा कोरोना काळातील लोकांचे लसीकरण असेल यावरून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करून केंद्रसरकार आपल्याच अहंकारात मश्गुल असल्याचेही नवाब मलिक म्हणाले.राहुल गांधींनीही साधला होता निशाणा?"मोदी सरकार ब्लू टिकसाठी भांडत आहे, कोरोनाची लस हवी असेल, तर आत्मनिर्भर व्हा" असं खोचक ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे. तसेच या ट्वीटसोबत Priorities हा हॅशटॅग देखील वापरला आहे. कोरोनाच्या संकटकाळात लसींचा तुटवडा असताना मोदी सरकार मात्र ट्विटरच्या ब्लू टिकला प्राधान्य देत आहे.  सोशल मीडिया कंपन्यांसाठी केलेल्या नव्या नियमांचे पालन करा, अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशारा देणारी अंतिम नोटीस केंद्र सरकारनेट्विटरला शनिवारी बजावली आहे. 

टॅग्स :nawab malikनवाब मलिकNarendra Modiनरेंद्र मोदीMohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघRahul Gandhiराहुल गांधीTwitterट्विटर