शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Tauktae Cyclone : “फडणवीस यांनी केंद्राकडून अधिक मदत मिळण्यासाठी आग्रह धरला पाहिजे, ही त्यांची जबाबदारी”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 13:58 IST

फडणवीसांनी तसं केलं तर ते राज्यातील जनतेसोबत आहेत हे सिद्ध होईल. कोकणातील जनतेला राज्य सरकार मदत करणारच मलिक यांचं वक्तव्य 

ठळक मुद्देफडणवीसांनी तसं केलं तर ते राज्यातील जनतेसोबत आहेत हे सिद्ध होईल, मलिक यांचं वक्तव्य कोकणातील जनतेला राज्य सरकार मदत करणारच : नवाब मलिक

“कोकणातील जनतेला भरपाई देणार आहोतच परंतु महाराष्ट्राला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मोदींकडे आग्रह धरला पाहिजे. त्यांनी तसे केले तर ते राज्यातील जनतेसोबत आहेत हे सिद्ध होईल. मात्र देवेंद्र फडणवीसमहाराष्ट्रासोबत नाहीत हे आता सिद्ध होऊ लागले आहे,” अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. “विरोधी पक्ष वैफल्यग्रस्त मानसिकतेतून टीका करत आहेत हे काल मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यसरकारची यंत्रणा, प्रशासन अंदाज घेत आहे. पंचनामे करत आहे. पालकमंत्री सातत्याने संपर्कात आहेत. मुख्यमंत्र्यांनी काही भागाचा दौरा केल्यानंतर त्याचा अंदाज पंचनाम्याच्या माध्यमातून येईल. त्यानंतर निश्चितरुपाने एनडीआरएफ, एसडीआरएफच्या स्टँडींग ऑर्डरपेक्षा त्याव्यतिरिक्त अतिरिक्त मदत देण्याची राज्यसरकारची भूमिका असेल,” असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रसरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी आग्रह धरला पाहिजे ही त्यांची जबाबदारी आहे. मात्र आग्रह धरत नाही आणि राज्य सरकार काय देणार यावर देवेंद्र फडणवीस बोलत आहेत असा टोलाही त्यांनी लगावला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले नाहीत. मात्र गुजरातला एक हजार कोटीचे पॅकेज दिले. आता जनता प्रश्न निर्माण करु लागल्यावर आमच्यावर प्रश्न निर्माण केला जात आहे. आम्ही भरपाई देणारच आहोत पण आधी देवेंद्र फडणवीस यांनी मोदींकडे आग्रह धरला पाहिजे. महाराष्ट्राला जास्त मदत मिळवून दिली पाहिजे,” असा सल्लाही नवाब मलिक यांनी दिला आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासोबत आहेत की, भाजप नेत्यांना वाचवायला लागले आहेत हे त्यांनी सांगावं असंही नवाब मलिक म्हणाले. 

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळnawab malikनवाब मलिकkonkanकोकणMaharashtraमहाराष्ट्रDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस