शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात जे काही घडतंय ते सर्व राजकीय सूडबुध्दीने; नवाब मलिक यांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 18:15 IST

ज्यापद्धतीने भाजपचे लोक मागणी करत आहेत व कारवाई होतेय, याचा अर्थ ठरवून राजकीय कारवाई सुरू झाली आहे, मलिक यांचं वक्तव्य.

ठळक मुद्देज्यापद्धतीने भाजपचे लोक मागणी करत आहेत व कारवाई होतेय, याचा अर्थ ठरवून राजकीय कारवाई सुरू झाली आहे, मलिक यांचं वक्तव्य.

"महाराष्ट्रात जे काही घडतंय ते सर्व राजकीय सूडबुध्दीने व राजकीय हेतूने घडतंय," असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांच्या विरोधात ईडीमार्फत जी कारवाई करण्यात येत आहे त्यावरुन नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. 

"ईडीमार्फत नेत्यांना नोटीस देणे, काही ठिकाणी छापे टाकले जात आहेत. त्यांना अधिकार असतील तर त्यांनी करावी परंतु ज्यापद्धतीने भाजपचे लोक मागणी करत आहेत व कारवाई होतेय, याचा अर्थ ठरवून राजकीय कारवाई सुरू झाली आहे," असेही नवाब मलिक म्हणाले. "सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत किती केसेस दाखल केल्या व प्रलंबित आहेत याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करायला ईडीला सांगितले होते," असेही त्यांनी नमूद केले.

"भाजप जनतेला धोका देतंय" "राज्यातील मंदिरं उघडण्यासाठी भाजपाकडून राज्यभरात आंदोलन केले जात आहे. पुण्यातील कसबा मंदिराच्या समोर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावरही नवाब मलिक यांनी टीका केली. कोविडचा धोका आहे, हे जनतेला कळत आहे. मोदी साहेब स्वत: सांगत आहेत तरी हे लोक ऐकत नाहीत. भाजप जनतेला धोका देत आहे. लोकांची दिशाभूल करत आहे," असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

"हिंमत होती म्हणून लढलो""भाजप केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे. त्यामुळेच ज्यांच्यात हिंमत नाही ते पक्ष सोडून भाजपमध्ये जात आहेत. भाजप बेजबाबदारपणे कृत्य करत आहे," अशी टीका नवाब मलिक यांनी केली. तसेच, नवाब मलिक यांनी थेट नारायण राणेंना लक्ष्य केले. "आमच्यात हिंमत होती म्हणून आम्ही लढलो. कायदेशीर लढा जो आहे, तो लढावा लागेल. पण आम्ही तुमच्यासारखे पक्ष सोडून आलो नाही. तुमच्यासारखे केंद्रीय मंत्री झालो नाहीत," अशा शब्दांत नवाब मलिक यांनी हल्लाबोल केला.

टॅग्स :nawab malikनवाब मलिकEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयMaharashtraमहाराष्ट्रNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा