Nawab Malik : "मोदीजी, आता कुणाच्या नशीबाने भाव वाढत आहेत, तुमच्या की जनतेच्या?", नवाब मलिकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 04:13 PM2021-10-17T16:13:38+5:302021-10-17T16:14:18+5:30

Nawab Malik : आजच्या दिवशी पेट्रोल व डिझेल आणि सीएनजी, एलपीजी यांचे भाव गगनाला भिडले आहेत त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी मोदीसरकारवर हल्लाबोल केला आहे.

NCP Leader Nawab Malik Criticizes Modi Govt On Petrol Disel Price Hike | Nawab Malik : "मोदीजी, आता कुणाच्या नशीबाने भाव वाढत आहेत, तुमच्या की जनतेच्या?", नवाब मलिकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा

Nawab Malik : "मोदीजी, आता कुणाच्या नशीबाने भाव वाढत आहेत, तुमच्या की जनतेच्या?", नवाब मलिकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा

Next

मुंबई - मेरे नशीबसे दाम कम हो रहे है असं बोलणारे मोदीजी आता कुणाच्या नशीबाने भाव वाढत आहेत. तुमच्या नशीबाने की जनतेच्या नशीबाने... कोण बदनशीब आहे, देशातील जनता की तुम्ही याचं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik ) यांनी केली आहे. (NCP Leader Nawab Malik Criticizes Modi Govt On Petrol Disel Price Hike)

आजच्या दिवशी पेट्रोल व डिझेल आणि सीएनजी, एलपीजी यांचे भाव गगनाला भिडले आहेत त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी मोदीसरकारवर हल्लाबोल केला आहे.  देशात पेट्रोल - डिझेलच्या मुद्दयावर भाजपने निवडणूक लढवली. अब की बार मोदी सरकार बोलत सत्तेवर आल्यानंतर काही काळात भाव कमी केले. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोदींनी मेरे नशीबसे दाम कम हो रहे है तो विपक्ष को क्यू बुरा लगता है, आपको नशीबवाला चाहिए की बदनशीबवाला चाहिए असे बोलून मोदींनी विरोधकांना डिवचले होते. दरम्यान हाच मुद्दा पकडून नवाब मलिक यांनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे.

Web Title: NCP Leader Nawab Malik Criticizes Modi Govt On Petrol Disel Price Hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app