शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

Ajit Pawar : कोण संजय राऊत?, उगाच कोणाच्या अंगाला का लागावं?; अजित पवार यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 10:47 IST

मी आमचा पक्ष आणि आमच्यापुरतं बोललो होतो, अजित पवार यांचं स्पष्टीकरण.

"मराठा आरक्षणासंदर्भात जो काही निकाल आलाय, त्याबाबत सरकारनं त्यांच्या विधी व न्याय खात्याला तज्ज्ञ लोकांना, विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन यावर तातडीनं काय करता येईल यावर विचार केला पाहिजे," असं असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नमूद केलं. "कोणावर अन्याय होऊ नये याची खबरदारी घ्यावी," असं स्पष्ट केलं.अजित पवार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. "तुम्ही बोलल्यानंतरही संजय राऊत सल्ले देत आहेत, त्यांची मतं मांडतायत," असा सवाल त्यांना पत्रकार परिषदेदरम्यान विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्यांनी कोण संजय राऊत असं म्हणत टोलाही लगावला. "मी कोणाचंही नाव घेतलं नव्हतं, कुणाच्या अंगाला का लागावं? मी आमचा पक्ष आणि आमच्यापुरतं बोललो होतो," असंही त्यांनी स्पष्ट केलं.राज्यपालांच्या पत्रावर भाष्य"खारघरसंदर्भात मी राज्यपालांना पत्र लिहिलं आहे. सरकारनं त्यात मृतांचा आकडा घोषित केला आहे. निश्चित आकडा मिळत नाही. परंतु काही लोक दबक्या आवाजात त्या उष्माघातात तिकडे काही लोकांना काही गोष्टी मिळाल्या नाही असं म्हणतात. मी पोस्टमार्टमचा रिपोर्ट माहितीच्या अधिकारात मागवली आहे. पण काही म्हणतात जी संख्या सांगितली जातात त्यात तफावत आहे असं म्हणतात," असंही अजित पवार यावेळी म्हणाले. महाराष्ट्र भूषण पुरस्कार जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून यावेळी सर्वाधिक खर्च केला आहे. त्यांनी सर्व टीम तिकडे राबत होती. राज्याचे प्रमुखही तिकडे जात होते. असं असतानाही तिकडे लोकांना पाणी का मिळालं नाही अशी ऐकव बातमी आहे. सर्व गंभीर बाब आहे, म्हणून मी न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केली.  

तेव्हा भूमिका स्पष्ट करू...फेब्रुवारी २०२२ मध्ये राज्यात जिल्हापरिषद,महापालिकेच्या निवडणुका होणार होत्या. तेव्हा अनेक इच्छुकांनी निरनिराळ्या पद्धतीनं आपलं मार्केटिंग केलं, जाहिरतबाजी केली, कामं केली, देवदर्शन केली, झाली का निवडणूक? आता ते बिचारे कंटाळून गेले केव्हा निवडणूक लागते हा विचार करून. त्यामुळे जेव्हा निवडणूक लागेल तेव्हा बसू, चर्चा करू, महाविकास आघाडीच्या संदर्भात काय भूमिका घ्यायची, कोणाला उमेदवारी द्यायची, मागच्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये मविआच्या घटकपक्षांचे किती नगरसेवक आले हे पाहून पुढील भूमिका ठरवू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSanjay Rautसंजय राऊतNCPराष्ट्रवादी काँग्रेस