शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत शरद पवारांबद्दल 'ते' वक्तव्य; चहुबाजूने टीका झाल्यावर अजित पवारांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 18:13 IST

अजित पवार यांनी काल बारामतीत शरद पवारांवर निशाणा साधल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी टोकदार टीका केली होती.

NCP Ajit Pawar Vs Sharad Pawar ( Marathi News ) : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल बारामती इथं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधताना केलेल्या एका वक्तव्याची राज्यभर मोठी चर्चा झाली. "आगामी लोकसभा निवडणुकीत ही आमची शेवटचीच निवडणूक आहे, असं सांगून काही लोकं तुम्हाला भावनिक करतील. पण खरंच कधी शेवटची निवडणूक आहे, हे मला माहीत नाही. परंतु तुम्ही भावनिक होऊ नका," असं म्हणत अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीत मी देईल त्या उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन मतदारांना केलं. आपल्या वक्तव्यातून शरद पवार यांच्यावर निशाणा साधणाऱ्या अजित पवार यांच्याविरोधात कालपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आक्रमक झाले. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतर नेत्यांनी अजित पवार हे शरद पवारांच्या मृत्यूची वाट पाहात आहेत का? असा घणाघाती सवाल विचारत टीकास्त्र सोडलं. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी काल केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत टीकाकारांवरही पलटवार केला आहे.

बारामतीत केलेल्या वक्तव्यावर खुलासा करताना अजित पवार म्हणाले की, "काल माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. माझं पहिल्यापासून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असल्यापासून एवढंच म्हणणं होतं की, ज्येष्ठ नेत्यांनी शारीरिक दगदगीचा विचार करावा आणि प्रकृतीची काळजी घ्यावी. हे मत मी पूर्वी देखील मांडलेलं आहे. मात्र काही लोक स्वतःच्या राजकारणासाठी ज्येष्ठ नेत्यांचा वापर करू पाहतात. त्यांना या गोष्टी कळणार नाहीत. माझ्या त्यांच्याबद्दलच्या भावना मी वेळोवेळी मांडलेल्या आहेत. पण काही लोकांना 'ध' चा 'मा' करायची सवयच असते, अशा नाटकीबाज लोकांना मी महत्त्व देत नाही. मात्र सर्वसामान्य लोकांना माझ्या भावना कळाव्यात, म्हणून मी हे म्हणणं मांडत आहे," अशी पोस्ट अजित पवार यांनी त्यांच्या 'एक्स' हँडलवर लिहिली आहे.

जितेंद्र आव्हाडांनी घेतला होता खरपूस समाचार

अजित पवार यांनी काल शरद पवारांवर निशाणा साधल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी टोकदार टीका केली होती. "अजित पवार यांनी आज हद्द ओलांडली आहे. काकाच्या मृत्यूची वाट बघत आहेत. शरद पवार कधी मरतील याची तुम्ही वाट बघता. काकीचे कुंकू कधी पुसले जाईल याची तुम्ही वाट पाहताय, तुमच्यासोबत काम केल्याची आता लाज वाटत आहे. ज्या कुटुंबाने तुम्हाला सर्व दिले, ज्या माऊलीने तुम्हाला सर्व दिले, तिचे कुंकू कधी पुसले जाईल याची आज तुम्ही वाट बघत आहात. असले घाणेरडे राजकारण महाराष्ट्राने कधी पाहिले नव्हते. ही महाराष्ट्राची आणि बारातमीची जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल,' असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला होता.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसJitendra Awhadजितेंद्र आव्हाड