आम्ही येडे म्हणून जन्माला आलोय का?; जेम्स लेन वादावर जितेंद्र आव्हाड संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 11:46 AM2022-04-17T11:46:46+5:302022-04-17T11:52:30+5:30

जेम्स लेनची सुरुवात कोणी केली ते सगळ्यांना माहिती आहे. जेम्स लेन इतक्या वर्षाने कसा सापडला? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

NCP Jitendra Awhad Reaction on James Lane controversy about Babasaheb Purandare | आम्ही येडे म्हणून जन्माला आलोय का?; जेम्स लेन वादावर जितेंद्र आव्हाड संतापले

आम्ही येडे म्हणून जन्माला आलोय का?; जेम्स लेन वादावर जितेंद्र आव्हाड संतापले

Next

मुंबई – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे(Babasaheb Purandare) यांना सॉफ्ट टार्गेट करण्याचं काम राष्ट्रवादीने केले. १९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर राज्यात जातीयवाद वाढला असा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. त्यानंतर शरद पवारांनी आपण बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरील केलेले आरोप आजही ठाम आहेत असं म्हणत स्पष्टीकरण दिले होते. त्यानंतर आता वादग्रस्त पुस्तकाचे लेखक जेम्स लेनच्या मुलाखतीनं राज्यातील वातावरण पुन्हा ढवळून निघालं आहे.

जेम्स लेनच्या मुलाखतीवर मंत्री जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) चांगलेच संतापले. आव्हाड म्हणाले की, हा वाद २००३ मध्ये सुरू झाला हा कुंभकर्ण झोपला होता का? एवढेच जर शिवाजी महाराजांबद्दल प्रेम होते तर तो मजकूर वगळला का नाही? जेम्स लेनला कोण मॅनेज करतंय हे माहिती नाही. जेम्स लेनची सुरुवात कोणी केली ते सगळ्यांना माहिती आहे. जेम्स लेन इतक्या वर्षाने कसा सापडला? किती मोठा कट आहे. महाराष्ट्रात अस्वस्थता निर्माण करण्याचं काम केले जात आहे. आम्ही येडे म्हणून जन्माला आलोय का? २००३ वाद, महाराष्ट्र भूषण तेव्हा जेम्स लेन कुठे होता? हा ईमेल कुठून मिळाला? महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळू नका परिणाम गंभीर होतील असा इशारा त्यांनी दिला.

काय म्हणाला जेम्स लेन?

ज्या छत्रपती शिवरायांबाबत जेम्स लेननं वादग्रस्त पुस्तक(James Laine Controversial Book) लिहिलं होते त्याने बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. इंडिया टुडेने घेतलेल्या मुलाखतीत जेम्स लेननं हे भाष्य केले आहे. त्या पुस्तकात आपण कुठलाही ऐतिहासिक दावा केला नाही. तसेच पुस्तकासाठी कुणीही माहिती पुरवली नाही असंही जेम्स लेननं म्हटलं आहे. जेम्स लेन म्हणतो की, माझं Shivaji Hindu King In Islamic India पुस्तक त्यात कुठलाही ऐतिहासिक दावा केला नाही. मी फक्त कथा सांगितली त्याला ऐतिहासिक तथ्य नाही. त्याचसोबत बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी एका शब्दानेही चर्चा झाली नाही असं स्पष्टीकरण त्याने दिले आहे.

शरद पवार म्हणतात...

"बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्या पुस्तकात चुकीचा इतिहास दाखवला, त्याचा मी यापूर्वीही विरोध केला आणि आजही करतो, मी मागे एकदा पुरंदरेबद्दल बोललो होतो. पुरंदरेंनी त्यांच्या पुस्तकात जिजामातेने महाराजांना घडवलं, हे सांगण्याऐवजी दादाजी कोंडदेव यांनी घडवल्याचं म्हटलं होतं. त्याला माझा सक्त विरोध आहे. महाराजांना जिजा मातेनेच घडवंल आहे. महाराजांच्या आयुष्यात सर्वात मोठं योगदान जिजामातेचे आहे. पुरंदरेंनी चुकीची माहिती दिली, त्याला माझा विरोध आधीही होता आणि आताही आहे असं शरद पवार(Sharad Pawar) म्हणाले होते.

तर दुसरी गोष्ट म्हणजे, जेम्स लेनेने त्याच्या पुस्तकात जे लिखाण केलं होतं, ते त्याने पुरंदरेंच्या माहितीच्या आधारे लिहील्याचं म्हटलं होतं. अतिशय घाणेरडं लिखाणं एखाद्या लेखकाने केले आणि त्याला माहिती पुरवण्याचे काम पुरंदरनी केले. त्यावर पुरंदरने कधीही स्पष्टीकरण दिले नाही. त्या गोष्टीला माझा विरोध आहे आणि मला त्याचा अभिमान आहे, असंही पवार म्हणाले होते.

 

Web Title: NCP Jitendra Awhad Reaction on James Lane controversy about Babasaheb Purandare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.