शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

आव्हाडांकडून हसन मुश्रीफांचा एकेरी उल्लेख; अजित पवार गटाचा जोरदार पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2023 11:20 IST

जितेेंद्र आव्हाडांच्या टीकेला अजित पवार गटाकडून ठाण्यातील नेते आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Jitendra Awhad NCP ( Marathi News ) : राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गटामध्ये राजकीय संघर्ष सुरू असून दिवसेंदिवस हा संघर्ष टोक गाठत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. नुकतंच आव्हाड यांनी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घणाघाती टीका केली होती. या टीकेला अजित पवार गटाकडून ठाण्यातील नेते आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

"राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एकेरी भाषेत टीका केली. आव्हाड यांची ही संस्कृती आहे. अनेकदा ते एकेरी भाषेत टीका करून लोकांचा अपमान करत असतात. मात्र हसन मुश्रीफ हे कोल्हापूरच्या लाल मातीतून येतात, पैलवानही आहेत. ते कधी तुम्हाला राजकारणात चितपट करतील, हे तुम्हाला कळणारही नाही," असा पलटवार आनंद परांजपे यांनी केला आहे. 

५३ आमदारांच्या पत्रावरूनही खोचक टोला

भाजपला समर्थन देण्यासाठी राष्ट्रवादीच्या ५३ आमदारांनी सह्यांचं पत्र दिलं होतं. मात्र अजित पवारांच्या दबावात मी सही केली आणि नंतर बाहेर येऊन जयंत पाटील यांना सांगितलं की, माझी सही ग्राह्य धरू नका, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. या दाव्यावरूनही आनंद परांजपे यांनी आव्हाडांवर निशाणा साधला. "तुम्ही कोणी लहान मूल होतात का? तुमच्या हात धरून कोणी जबरदस्तीने ती सही घेतली होती का?" असा सवाल परांजपे यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, आनंद परांजपे यांनी केलेल्या या टीकेवर जितेंद्र आव्हाड काही भाष्य करतात का,  हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडHasan Mushrifहसन मुश्रीफAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस