शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
5
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
6
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
7
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
8
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
9
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
10
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
11
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
12
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
13
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
14
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
15
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
16
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
17
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
18
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
19
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
20
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली

'काकां'पासून अंतर, मात्र त्यांच्या गुरूला 'वंदन'; अजितदादांच्या जाहीरनाम्यात यशवंतराव चव्हाणांबाबत मोठं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 15:20 IST

राष्ट्रवादीने यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.

NCP Ajit Pawar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला जाहीरनामा आज प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात राष्ट्रवादीने घोषणांचा पाऊस पाडला असून राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असणारा भारतरत्न पुरस्कार मिळावा, यासाठी पुढाकार घेणार असल्याचंही म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी माझा फोटो आपल्या पोस्टर्सवर वापरू नका, असं सांगितल्यानंतर अजित पवारांच्या पक्षाकडून पवार यांच्या जागी यशवंतराव चव्हाण यांचा फोटो वापरला जात आहे. त्यातच आता राष्ट्रवादीने चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.

यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांच्याकडे राज्याच्या राजकारणात गुरू-शिष्याची जोडी म्हणून पाहिलं जातं. शरद पवारांच्या राजकीय उदयात चव्हाण यांचा मोठा वाटा राहिला आहे. तसंच माझ्या राजकीय जीवनाचा आदर्श हे यशवंतराव चव्हाण हेच असल्याचं शरद पवार वारंवार सांगत असतात. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार यांच्याकडून याच यशवंतराव चव्हाण यांचा फोटो आपल्या पक्षाच्या पोस्टर्सवर वापरून शरद पवार यांना आव्हान दिलं जात आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात कोणकोणती आश्वासने?

जातनिहाय जनगणनेला भाजपचा विरोध असताना महायुतीचा घटकपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीने मात्र जातनिहाय जनगणनेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असं आश्वासन देण्यात आलं आहे. तसंच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी पाठपुरावा करू, उर्दू शाळांना सेमी इंग्रजीचा दर्जा मिळावा, यासाठी प्रयत्न करणे, शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य एमएसपी मिळणे, अपारंपरिक वीजनिर्मिती करणे, उद्योगांना प्राधान्य, कृषी पिक विम्याच्या व्याप्तीत वाढ, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषेदत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं याकरता पाठिंबा अशी आश्वासने राष्ट्रवादीने दिली आहेत.

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४