शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

राष्ट्रवादी प्रचंड आशावादी; 'या' 10 जागा जिंकण्याचा एनसीपीला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 13:07 IST

सध्या राज्यात राष्ट्रवादीचे पाच खासदार आहेत

मुंबई: गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत धूळधाण उडालेल्या राष्ट्रवादीला यंदा किमान दहा जागा जिंकता येतील, असा विश्वास वाटतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत चाचपणीतून हा आकडा समोर आला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबत आघाडी करण्याबद्दल राष्ट्रवादी ठाम आहे. तशी चर्चादेखील दोन्ही पक्षांमध्ये सुरू आहे. राज्यातील एकूण 48 पैकी केवळ 5 मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. यात बारामती (सुप्रिया सुळे), माढा (विजयसिंह मोहित-पाटील), सातारा (उदयनराजे भोसले), कोल्हापूर (धनंजय महाडिक) आणि भंडारा-गोंदिया (मधुकर कुकडे) या मतदारसंघांचा समावेश आहे. हे पाचही मतदारसंघ कायम राखण्याचा राष्ट्रवादीला विश्वास आहे. याशिवाय रायगड, मावळ, शिरुर, बुलढाणा, परभणी या मतदारसंघातही राष्ट्रवादीला यश मिळेल, असं अंतर्गत अहवाल सांगतो. गेल्या निवडणुकीत रायगडची जागा थोड्याशा फरकानं राष्ट्रवादीच्या हातून निसटली होती. ही जागा यंदा सुनील तटकरे खेचून आणतील, असा विश्वास पक्षाला आहे. तर मावळमध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा आहे. शिरुरमधून विलास हांडे, तर बुलडाण्यातून राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या सर्व जागांवर राष्ट्रवादीला विजयाची खात्री वाटते. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळे