शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

“देवेंद्र फडणवीस-गिरीश महाजनांनी मराठा समाजाला दिलेला आरक्षणाचा शब्द पाळावा”: एकनाथ खडसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 17:28 IST

Eknath Khadse On Maratha Reservation Issue: सरकारची प्रामाणिक इच्छा असेल तर बिहारप्रमाणे १६ टक्के जास्तीचे कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण द्यायला पाहिजे, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

Eknath Khadse On Maratha Reservation Issue:मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस अधिक तापताना दिसत आहे. मनोज जरांगे पाटील सरकारला सातत्याने २४ डिसेंबरची आठवण करून देत आहेत. तर, दुसरीकडे ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याला विरोधही वाढताना पाहायला मिळत आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देत, देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी मराठा समाजाला दिलेला आरक्षणाचा शब्द पाळावा, असे म्हटले आहे. 

मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर आपण राजकारणातून संन्यास घेऊ अशा प्रकारचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी मागील काळात केले होते, त्यामुळे देवेंद्र फडणीस यांनी आपला शब्द पाळावा आणि मराठ्यांना आरक्षण द्यावे. यावेळी संकटमोचक म्हणून नावारूपाला आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांनीही यातून मार्ग काढावा. आपला शब्द पाळावा, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले. 

मराठा समाजाला वारंवार झुलवत ठेवणे योग्य नाही

मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकारने सुरुवातीला काही दिवसांची मुदत मागितली होती. त्यांनतर पुन्हा मुदत वाढून घेतली. यामुळे साहजिकच आरक्षण मिळण्यासंदर्भात मराठा समाज्याच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. सरकारने लवकर निर्णय घ्यावा. सरकारची प्रामाणिक इच्छा असेल तर बिहारप्रमाणे १६ टक्के जास्तीचे कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण द्यायला पाहिजे. मराठा समाजाला वारंवार झुलवत ठेवणे आणि खेळवत राहणे राजकीय दृष्ट्या योग्य नाही, असे सूचक विधान एकनाथ खडसे यांनी केले. 

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कॅसिनोतील व्हायरल फोटोबाबत एकनाथ खडसे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर बोलताना, चंद्रशेखर बावनकुळे यांचे  कॅसिनोमधील फोटो संजय राऊत यांनी वायरल केला आहे. अजून काही व्हिडिओ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्याकडे असलेली क्लीप समोर अणावी, म्हणजे खरे काय ते जनतेसमोर येईल. मात्र महाराष्ट्र संकटात असताना एखाद्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने असे करणे नाही, असे एकनाथ खडसे म्हणाले.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणeknath khadseएकनाथ खडसे