शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

वाल्मिक कराडांशिवाय पानही हलत नाही?; पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर धनंजय मुंडे पहिल्यांदाच बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 13:22 IST

विरोधकांनी हिवाळी अधिवेशनात लक्ष्य केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपली बाजू मांडली आहे आणि वाल्मिक कराड यांच्याशी असलेल्या संबंधांवरही भाष्य केलं आहे. 

NCP Dhananjay Munde ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात ज्या आरोपींना अटक करण्यात आली आहे ते आरोपी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्या जवळचे असल्याचा आरोप होत आहे. तसंच हत्या प्रकरणानंतर कराड यांच्याविरोधात २ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हाही दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी हिवाळी अधिवेशनात लक्ष्य केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपली बाजू मांडली आहे आणि वाल्मिक कराड यांच्याशी असलेल्या संबंधांवरही भाष्य केलं आहे. 

"बीड जिल्ह्यात माझ्यासाठी आणि पंकजा मुंडेंसाठी काम करणारी असंख्य लोकांची टीम आहे, त्यात एक वाल्मिक कराड आहेत. त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा का दाखल झाला आहे, कशामुळे झाला आहे, त्यांचा संबंध किती आहे, या सर्व गोष्टी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज विधिमंडळात निवदेन मांडणार आहेत त्यामध्ये येतील," अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी झालेल्या दसरा मेळाव्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या जवळीकीविषयी बोलताना "ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही ते वाल्मिक कराड" असा उल्लेख केला होता.

वाल्मिक कराड आणि सरपंच हत्या प्रकरणाचा संबंध काय? ज्या पवनचक्की कंपनीच्या कार्यालय परिसरात झालेल्या वादावरून सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली त्या पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्याकडे २ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यासह  तिघांविरोधात केज पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे. वाल्मिक कराड (रा. परळी), विष्णू चाटे (रा. कौडगाव, ता. केज) व सुदर्शन घुले (रा. टाकळी, ता. केज) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.  

दरम्यान, या खंडणी प्रकरणातील काही आरोपींची सरपंच हत्या प्रकरणातील गुन्ह्यातही नावे आहेत. त्यामुळे मस्साजोगच्या गावकऱ्यांसह विविध नेत्यांकडून हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर आरोप करण्यात येत असून त्यांच्या अटकेची मागणी होत आहे.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेBeedबीडNCPराष्ट्रवादी काँग्रेसPankaja Mundeपंकजा मुंडेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरण