शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

Clyde Crasto : "क्या इस कहानी मे ट्विस्ट बाकी है?"; राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदे सरकारला खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 12:31 IST

NCP Clyde Crasto Slams BJP : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते क्लाईड क्रास्टो यांनी भाजपा का गप्प आहे? असा सवाल विचारला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे.

मुंबई - राज्यात भाजपा आणि शिवसेनेचा शिंदे गट यांनी एकत्र येत सत्तास्थापन केली आहे. या सर्व घडामोडीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे मुख्यमंत्री असतील मी मंत्रिमंडळात सहभागी नसेन असं विधान देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadnavis) यांनी केले होते. त्यानंतर काही तासातच भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने फडणवीसांच्या निर्णयाला बदलून त्यांना मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हा निर्णय देवेंद्र फडणवीसांना कळवण्यात आला. यानंतर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. याच दरम्यान आता राष्ट्रवादीने काँग्रेसने "क्या इस कहानी मे ट्विस्ट बाकी है?" असं म्हणत शिंदे सरकारला खोचक टोला लगावला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते क्लाईड क्रास्टो यांनी भाजपा का गप्प आहे? असा सवाल विचारला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. "अडीच वर्ष कटकारस्थान केली आणि महाराष्ट्रातले #MVA सरकार पडले, नंतर त्याग देखील केला आणि मुख्यमंत्रीपद सोडले. एवढे सर्व करून सुद्धा मंत्र्यांची कार्यकारिणी अजून जाहीर झाली नाही. भाजपा का गप्प आहे? सुप्रीम कोर्टाच्या निकालाची वाट बघत आहे का? "क्या इस कहानी मे ट्विस्ट बाकी है?"" असं क्लाईड क्रास्टो यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

क्रास्टो यांनी दीपक केसरकरांवर देखील जोरदार निशाणा साधला आहे. "आदरणीय शरद पवार साहेबांवर टीका करून फुकट प्रसिद्धी मिळवणार्‍यांच्या यादीमध्ये दीपक केसरकर यांचे नाव जोडले गेले आहे. केसरकर मोठ्या मंत्रिपदाच्या आशेने स्वतःची प्रसिद्धी करत आहेत. पडळकर व सदाभाऊ खोत हे देखील टीका करतात पण त्याचा फायदा होत नाही हे केसरकर यांनी लक्षात ठेवावे" असं देखील क्लाईड क्रास्टो यांनी म्हटलं आहे. 

"केसरकर सध्या तुम्ही हवेत आहात, उगाच आम्हाला तोंड उघडायला लावू नका, हवेतून खाली या"

राष्ट्रवादीने आता केसरकरांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "केसरकर सध्या तुम्ही हवेत आहात, उगाच आम्हाला तोंड उघडायला लावू नका, हवेतून खाली या" असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (NCP Amol Mitkari) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "केसरकर साहेब सध्या तुम्ही हवेत आहात. पवार साहेबांवर बोलल्याने प्रसिध्दी मिळते हे तुम्ही जाणून आहात. तुमची अजितदादांसमोर असणारी केविलवाणी अवस्था मी अनेकदा पहिली आहे. उगाच आम्हाला तोंड उघडायला लावू नका. हवेतून खाली या. तसेही तुमची बडबड जास्त दिवस चालणार नाही" असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस