शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांकडून नाशिक दौरा अचानक रद्द; उद्या १६ मंत्र्यांची महत्त्वाची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 12:42 IST

शरद पवार हेलिकॉप्टरनं मुंबईला रवाना; नाशिकमधले नियोजित कार्यक्रम रद्द

नाशिक: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिक दौरा रद्द केला आहे. नाशिक दौरा रद्द करुन शरद पवार मुंबईकडे रवाना झाले आहेत. उद्या त्यांनी राष्ट्रवादीच्या १६ मंत्र्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या तपासावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यातले मतभेद समोर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी मंत्र्यांची बैठक बोलावल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. राज्यातील वकिलांच्या परिषदेच्या समारोप कार्यक्रमासाठी शरद पवार नाशिकमध्ये येणार होते. सकाळी 11 वाजता ते राष्ट्रवादी भवनात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीदेखील घेणार होते. त्यामुळे कार्यकर्ते मोठ्या संख्येने भवनात जमले होते. मात्र जळगावमधून खास हेलिकॉप्टरनं ते नाशिक शहराजवळील आडगावमधल्या भुजबळ नॉलेज सिटीच्या हेलिपॅडवर आले. इथूनच ते हेलिकॉप्टरनं त्वरित मुंबईकडे रवाना झाले.शरद पवार यांनी उद्या राष्ट्रवादीच्या १६ मंत्र्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. एल्गार प्रकरणाच्या तपासावरुन महाविकास आघाडी सरकारमधले मतभेद समोर येत असताना पवारांनी ही बैठक बोलावली आहे. राराज्य सरकारनं एसआयटीच्या माध्यमातून एल्गार प्रकरणाचा तपास करावा, अशी मागणी शरद पवार यांनी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे केली होती. यानंतर अवघ्या काही तासांमध्ये केंद्रानं हा तपास एनआयएकडे सोपवला.एल्गारचा तपास राज्य सरकारनं करावा, अशी आग्रही मागणी शरद पवार करत असताना मुख्यमंत्र्यांनी हा तपास एनआयएकडे सोपवण्यास परवानगी दिली. याबद्दल पवारांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. केंद्राचा निर्णय अयोग्य असून मुख्यमंत्र्यांचा निर्णय त्याहून अयोग्य असल्याचं पवार म्हणाले होते. यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एल्गार प्रकरणाचा समांतर तपास करण्याचे संकेत दिले. याबद्दल कायदेशीर सल्ला घेत असल्याचं त्यांनी सांगितलं.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारShiv Senaशिवसेना