शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Amol Mitkari : "आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी विशेष टॉयलेटची व्यवस्था"; मिटकरींनी ट्विट केला 'तो' Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 11:26 IST

NCP Amol Mitkari : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

भूखंडाचा श्रीखंड खाणार्‍या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असं म्हणत चौथ्या दिवशीही महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला आहे. आमदारांनी भूखंडाचा श्रीखंड वाटून मिंधे सरकारचा निषेध केला. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी (NCP Amol Mitkari) यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

"आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी विशेष टॉयलेटची व्यवस्था" असं म्हणत निशाणा साधला आहे. आमदार निवासातील कपबशी धुण्यासाठी टॉयलेटमधील पाण्याचा वापर करण्यात येत असल्याचं मिटकरींनी म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबतच एक व्हिडीओ शेअर केला आहे. "हे आहे नागपूर हिवाळी अधिवेशनातील आमदार निवासस्थानातील उपहारगृह. हजारो कोटीचे टेंडर कंत्राट दाराला दिल्यानंतर आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी कंत्रादारांकडून विशेष टॉयलेटची व्यवस्था" असं अमोल मिटकरी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

आझादी का अमृतमहोत्सव हा हॅशटॅग देखील मिटकरींनी वापरला आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर "घेतले खोके, भूखंड ओके... दिल्लीचे मिंधे, एकनाथ शिंदे... राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव... धिक्कार असो, धिक्कार असो, मिंधे सरकारचा धिक्कार असो... बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे... राजीनामा द्या, राजीनामा द्या मुख्यमंत्री राजीनामा द्या...महापुरुषांचा अपमान करणार्‍या भाजप सरकारचा धिक्कार असो...भूखंडाचा श्रीखंड खाणार्‍या सरकारचा धिक्कार असो... भूखंडाचा श्रीखंड खाल्ला कुणी, मुख्यमंत्री मुख्यमंत्री...गुजरातला फॉक्सकॉन, महाराष्ट्राला पॉपकॉर्न" अशा जोरदार घोषणा देत आजही दणाणून सोडला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Amol Mitkariअमोल मिटकरीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाnagpurनागपूर