शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
2
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
3
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
4
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
5
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
6
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
7
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
8
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
9
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
10
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
11
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
12
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
13
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
14
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
15
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
16
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
17
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
18
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
20
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 

शरद पवारांचे फोटो लावण्यावरून वाद; अमोल मिटकरींनी जितेंद्र आव्हाडांना चांगलेच खडसावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 10:41 IST

Amol Mitkari Vs Jitendra Awhad: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांचा फोटो वापरण्यावरून कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे.

Amol Mitkari Vs Jitendra Awhad:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर कुणाकडे किती आमदार, याबाबत सस्पेन्स कायम आहे. शरद पवार आणि अजित पवार गटांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. दोन्ही गटांकडून बोलावलेल्या बैठकीत कुणाकडे किती आमदार याचे चित्र स्पष्ट होऊन कोण ‘पॉवर’बाज हेही स्पष्ट होणार आहे. यातच आता शरद पवार यांचे फोटो बॅनरवर लावण्यावरून अमोल मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाडांना चांगलेच खडसावल्याचे सांगितले जात आहे. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेच्या प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवर शरद पवार यांचे फोटो लावावेत, अशा सूचना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. यावर, मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनीच आमचे फोटो वापरावे. ज्यांनी आमच्या विचारसरणीचा विश्वासघात केला, त्यांनी माझा फोटो वापरू नये. माझा फोटो कुणाला वापरू द्यायचा, हा माझ्या हयातीत तरी माझाच निर्णय आहे, असे स्पष्ट करत शरद पवार यांनी पलटवार केला. यावर जितेंद्र आव्हाड आणि अमोल मिटकरींध्ये शाब्दिक चकमक उडाल्याचे पाहायला मिळत आहे. 

काय म्हणाले अमोल मिटकरी आणि जितेंद्र आव्हाड?

महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी शरद पवारांचा फोटो वापरला होता. त्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की, जिवंत माणूस जेव्हा सांगतो, माझे फोटो वापरायचे नाहीत. तर, विषय संपला. तुमच्याकडे आहेत, ना तुमचे राष्ट्रीय नेते दिल्लीचे वगैरे. त्यांचे फोटो वापरा. शरद पवार कशाला पाहिजेत?, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. यावर अमोल मिटकरी यांनी पलटवार केला. शरद पवार जितेंद्र आव्हाडांची खासगी मालमत्ता नाही आहेत. शरद पवार सर्वांचे आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी अशी वक्तव्ये करू नयेत, या शब्दांत अमोल मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाड यांना प्रत्युत्तर दिले. 

दरम्यान, जास्तीत जास्त आमदार, पदाधिकारी आपल्याकडे असल्याचा दावा अजित पवार गट करत आहे. तर आपल्याकडेच जास्त संख्याबळ असल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर या बैठकांमधून कोणाकडे किती ताकद हे स्पष्ट होणार आहे. एकमेकांच्या मांडीला मांडी लावून काम करणारे कार्यकर्ते दोन गटात विभागले आहेत. त्यामुळे शिवसेनेसारखी स्थिती राष्ट्रवादीत निर्माण झाली आहे. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षAmol Mitkariअमोल मिटकरीJitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेस