शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

Maharashtra Political Crisis: “शिंदे गटाला भाजपमध्ये विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही, महाराष्ट्रात लवकरच महाभारत!”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 9:56 AM

Maharashtra Political Crisis: मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असताना फडणवीस आणि शिंदेंचा दिल्ली दौरा रद्द झाल्यावरून राष्ट्रवादीने टीका केली आहे.

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नेमका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नवे सरकार स्थापन होऊन आता महिना होत आला तरी मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. एकनाथ शिंदे यांची दिल्ली वारी वाढली असून, अद्यापही मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुहूर्त सापडत नाही. यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी महाराष्ट्रात लवकरच महाभारत घडणार असल्याचे सूतोवाच केले आहे.  

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा अचानक रद्द झाला. त्यामुळे विस्तार आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. शिंदे आता दिल्लीत परत कधी जाणार, हेही निश्चित नाही. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आणि काही बैठकांनंतर शिंदे दिल्लीला रवाना होणार होते. दिल्लीत त्यांचा मुक्काम होता. ते कोणाला भेटणार, याबाबत त्यांच्या कार्यालयाने कोणतीही माहिती दिली नाही. राज्यातील राजकीय परिस्थितीसंदर्भातील न्यायालयीन प्रकरणाबाबत काही ज्येष्ठ वकिलांशी ते चर्चा करणार होते आणि भाजपच्या श्रेष्ठींनादेखील विस्ताराच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी भेटणार होते, अशी माहिती आहे. यावरून अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे. 

महाराष्ट्रात लवकरच महाभारत!

शिंदे गटाला भाजपमध्ये विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही, असेच साधारण सर्व घडामोडींवरून चित्र निर्माण झाले आहे, असा दावा करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रद्द झालेल्या दिल्ली दौऱ्यांवरून महाराष्ट्रात लवकरच महाभारत घडणार असल्याचे सूतोवाच अमोल मिटकरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले आहेत. तसेच अजित पवार यांच्यावर टीका करणाऱ्या भाजप खासदार अनिल बोंडे यांचाही खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. अजितदादाइतके आठवड्यातून एक दिवस तरी काम करून दाखवा, बारा तासाच्या आत दवाखान्यात ऍडमिट व्हावे लागेल. त्यांची बरोबरी तुम्हाला सात जन्मही करता येणार नाही. तुमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बळीराजाला वाऱ्यावर सोडून दिल्लीवारी करताहेत यावर जरा तोंड उघडा, या शब्दांत अमोल मिटकरींनी अनिल बोंडे यांना सुनावले आहे. 

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे गुरुवारी दिल्लीला जात आहेत. ते २९ जुलै रोजी मुंबईत परततील. त्यामुळे दोन दिवस तरी विस्तार होणार नाही, असे म्हटले जात आहे. मुख्यमंत्री शिंदे हे आतापर्यंत चारवेळा दिल्लीला जाऊन आले आहेत.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmol Mitkariअमोल मिटकरी