शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

अपत्य प्राप्तीसाठीच नक्षली दाम्पत्याचे आत्मसर्मपण

By admin | Updated: June 8, 2014 00:50 IST

नक्षल दलममध्येच आमची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि आम्ही लग्न केले. लग्नानंतर साहजिकच आम्हाला मूल हवे होते. मात्र नक्षल चळवळीतून त्याला प्रखर विरोध होता. नसबंदीसाठी

नसबंदीसाठी दबाव : युवक-युवतींमध्ये प्रचंड असंतोषगडचिरोली : नक्षल दलममध्येच आमची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि आम्ही लग्न केले. लग्नानंतर साहजिकच आम्हाला मूल  हवे होते. मात्र नक्षल चळवळीतून त्याला प्रखर विरोध होता. नसबंदीसाठी आमच्यावर दबाव आणला जात होता. त्यामुळे सामान्य नागरिकांप्रमाणे सुखी  जीवन जगण्यासाठी आत्मसर्मपणाशिवाय आम्हाला दुसरा पर्याय दिसत नव्हता. शेवटी आत्मसर्मपण करायचे ठरविले आणि अखेर अपत्य प्राप्तीसाठी  आम्ही दोघांनी पोलिसांसमोर आत्मसर्मपण केले, अशी माहिती आत्मसर्मपण करणार्‍या नक्षली दाम्पत्याने पोलिसांना दिली. संदीप ऊर्फ महेंद्र केरामे (२६) रा. खुनेरा, जि. राजनांदगाव (छत्तीसगड) आणि शीला ऊर्फ लता गोटा (२0) रा. कोरची, जि. गडचिरोली असे या  आत्मसर्मपित नक्षल दाम्पत्याचे नाव आहे. नुकतेच त्यांनी पोलिसांसमोर आत्मसर्मपण केले. अकरावीपयर्ंत शिक्षण घेतलेल्या संदीपला नक्षल्यांनी बळजबरीने दलममध्ये सहभागी केले. तर शीला प्लाटून ५६ ची सदस्य होती. उत्तर  गडचिरोली-गोंदिया डिव्हिजनचा डिव्हिजनल कमांडर पहाडसिंगचा अंगरक्षक असलेल्या संदीपने शीलासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला.  शीलानेही होकार दिला. मात्र चळवळीतील नक्षल्यांचा लग्नाला प्रखर विरोध होता. अखेर सहकार्‍यांचा विरोध झुगारुन खुद्द पहाडसिंगने जानेवारी  २0१४ मध्ये संदीप आणि शीलाचे लग्न गडचिरोलीच्या जंगलात लावून  दिले.लग्नानंतर मूल व्हावे, अशी संदीप आणि शीलाची इच्छा होती. मात्र नसबंदीसाठी त्यांच्यावर चळवळीतून दबाव येऊ लागला. यापूवीसुद्धा चळवळीतील  अनेक युवक-युवतींची जबरीने नसबंदी करण्यात आली होती. मात्र आम्हाला मूल पाहिजे होते. अखेर लग्न लावून देणार्‍या पहाडसिंगनेच आम्हाला  आत्मसर्मपणाचा सल्ला दिला, असे या नक्षल दाम्पत्याने सांगितले.चळवळीत युवतींना जबरदस्तीने सहभागी करून त्यांचे लैंगिक शोषण करणे ही नित्याचीच बाब झाली आहे. तसेच जबरीने नसबंदी होत असल्यामुळे  चळवळीतील युवक-युवतींमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यातच पोलिसांनी नसबंदी शस्त्रक्रिया रिओपन करण्याबाबत तयार केलेले पोस्टर आम्ही  पाहिले. आत्मसर्मपित नक्षल दाम्पत्यांची जिल्हा सामान्य रुग्णालयात नसंबदी शस्त्रक्रिया पुन्हा खुली  केली जाते व त्यांना अपत्याचा लाभ घेता येतो, ही  गोष्ट ऐकली होती, असेही या दाम्पत्याने  सांगितले. पहाडसिंगने आपल्या चळवळीचा विस्तार करण्यासाठी आतापयर्ंत अनेक तरुण-तरुणांना या हिंसक चळवळीत ओढले. मात्र आपला अंगरक्षक संदीप  आणि शीलाचे लग्न लावून दिल्यानंतर त्यांनी पोलिसांपुढे आत्मसर्मपण करावे, असा सल्ला देणार्‍या पहाडसिंगने यापूर्वीसुध्दा आपल्या मुलींनी शिकून  सवरून डॉक्टर व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली होती.  (स्थानिक प्रतिनिधी)