शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

नवाब मलिकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, चंद्रकांत पाटलांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 2:35 PM

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केलं, पण अद्याप ठाकरे सरकारने कर कमी केला नाही.

कोल्हापूर: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करावा आणि त्यांची एनआयए(NIA)कडून चौकशी व्हावी अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. आज चंद्रकांत पाटलांनी माध्यमाशी संवाद साधला, यावेळी त्यांनी विविध मुद्यांवरुन राज्य सरकारवर टीका केली.

आम्ही कोणत्याही कारवाईला घाबरत नाहीतयावेळी चंद्रकात पाटील म्हणाले की, नवाब मलिकांना राज्यातील कोणत्याही गावात फिरू देणार नसल्याचं म्हटलंय. यामुळे एनआयएनं नवाब मलिकांना तात्काळ ताब्यात घेऊन चौकशी केली पाहिजे आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच, नवाब मलिक यांच्या कन्या निलोफर मलिक-खान यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या कायदेशीर नोटिशीबद्दल विचारले असता, आम्ही चळवळीतील कार्यकर्ते आहोत, आम्ही कोणत्याही कारवाईला घाबरत नाहीत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. 

ठाकरे सरकारने कर कमी करावापुढे म्हणाले, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क 5 आणि 10 रुपयांनी कमी केलं आहे. त्यानंतर 11 भाजपशासित आणि इतर काँग्रेसशासित राज्यांनीदेखील कर कमी केले आहेत. पण, ठाकरे सरकारने कर कमी करण्याचा निर्णय अद्याप घेतला नाही, असंही ते म्हणाले. याशिवाय, दररोज सकाळी बोलून संजय राऊत दमले, आता नवाब मलिक बोलत आहेत. संजय राऊत यांना बोर्नविटा पिण्याची गरज आहे, असा टोलाही चंद्रकांत पाटलांनी लगावला.

मुख्यमंत्री सरकारी हॉस्पिटलमध्ये का जात नाहीत ?पाटील पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरेंना उपचारासाठी सरकारी रुग्णालय का चालत नाही ? मुख्यमंत्री सरकारी रुग्णालयात उपचार घेत नाहीत, याचा अर्थ राज्यातील सरकारी रुग्णालय सुस्थितीत नाहीत हे सिद्ध होतंय. मला वैयक्तिक टीका करायची नाही. पण, देवेंद्र फडणवीस यांना कोरोना झाल्यानंतर ते सरकारी रुग्णालयात दाखल झाले होते, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलnawab malikनवाब मलिकUddhav Thackerayउद्धव ठाकरे