शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Chandrakant Patil on Nawab Malik: 'तुमचा एक मंत्री जेलमध्ये तर दुसरा...', चंद्रकांत पाटलांनी वाचला पाढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 16:07 IST

Chandrakant Patil on Nawab Malik: 'नवाब मलिक यांना मंत्रिमंडळात राहण्याचा नैतिक आणि कायदेशीर अधिकार नाही.

मुंबई: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना चौकशीनंतर ईडी(ED)ने अटक केली आहे. त्यांच्या अटकेनंतर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. भाजप नते चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil)  यांनीही मलिकांच्या अटकेनंतर राज्य सरकारवर जोरदार टीका केली, तसेच मंत्र्यांच्या प्रकरणांचा पाढाच वाचला.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?नवाब मलिक यांच्या अटकेनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'अशाप्रकारचे आरोप झाल्यानंतर नवाब मलिक यांना मंत्रिमंडळात राहण्याचा नैतिक आणि कायदेशीर अधिकार नाही. मी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मागणी करतो की, त्यांनी मलिक यांची तात्काळ हकालपट्टी करावी. मलिकांची हकालपट्टी केली नाही', तर भाजप आंदोलन करेल.

ते पुढे म्हणाले की, 'मुख्यमंत्री आता कशाची वाट पाहताहेत? तुमच्या एक मंत्री मुलीच्या आत्महत्या प्रकरणात गेला, तुमचा गृहमंत्री जेलमध्ये आहे, मुंबईचे पोलिस कमिश्नर अचानक गायब होता, त्यांच्यावरही केसेस आहेत. तुमचा एक पोलिस अधिकारी सचिन वाझे जेलमध्ये आहेत, तुमचे एक मंत्री ईडीसमोर हजर राहत नाहीत, म्हणून त्यांनासक्तीन हजर करावं लागतं.'

'माझ्याकडे 22 पानी नोट'

'तुमच्या एका मंत्र्यांचे रिसॉर्ट तोडण्याची केंद्रातून ऑर्डर निघाली तर दुसऱ्या एकाने भीतीपोटी स्वतः बंगला तोडला, तुमच्या एका मंत्र्यांच्या दोन बायका आहेत, जे कायद्यात बसत नाही, ही यादी वाचताना मला दम लागला. मी एक नोट तयार केली आहे, ज्यामध्ये या सरकारमधील मंत्र्यांनी काय-काय केले त्याची यादी आहे. ही यादी तयार करताना 22 पाने भरली. ही अशी सगळी प्रकरणे असूनही सरकार काहीच करत नाहीत', अशी टीका पाटील यांनी केली. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलnawab malikनवाब मलिकBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय