शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Nawab Malik vs BJP, Wine Selling: "सगळ्यात जास्त दारूडे भाजपामध्येच"; महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 19:01 IST

वाईन विक्रीच्या निर्णयावरून मलिकांनी भाजपावर केली टीका

Nawab Malik vs BJP, Wine Selling: महाविकास आघाडी सरकारने राज्यातील सुपरमार्केट आणि जनरल स्टोअर्समध्ये वाईन विक्रीला (Wine sale in Super Market and General Stores) परवानगी दिली. राज्य सरकारच्या या निर्णयावरुन भाजपाने (BJP) आक्रमक पवित्रा घेतला. इतरही अनेकांनी या निर्णयाला विरोध केला. तशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारच्या या वाईन संदर्भातील निर्णयावर महत्त्वाचे विधान केले. वाईन विक्रीला दिलेली परवानगी आणि त्याला होत असलेला विरोध हा फार चिंतेचा विषय नाही. पण जर अनेक स्तरातून विरोध होत असेल आणि राज्य सरकारने या संदर्भात निर्णय बदलला तरी त्याचे मला वाईट वाटण्याचे कारण नाही, असं शरद पवार म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर आजच मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाईन विक्रीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी याबद्दलची माहिती दिली. तसेच, महाराष्ट्रात भाजपाचेच लोक सर्वात जास्त दारूडे असल्याचं विधानही त्यांनी केलं.

"महाराष्ट्रात सुपर मार्केटने वाईन विक्रीसाठी ठेवण्याचा जो निर्णय महाराष्ट्र सरकारने जाहीर केला होता, त्या निर्णय़ाला आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. भाजपाचे लोक यावर बरीच चर्चा करताना दिसत आहेत. भाजपाने काही प्रश्नांची उत्तर द्यावीत की भाजपाच्या नेत्यांचे वाईन शॉप महाराष्ट्रात आहेत की नाहीत? अनेक माजी मंत्र्यांचे बार आहेत की नाहीत? काही केंद्रीय मंत्र्यांचे महाराष्ट्रात बार आहेत की नाही? या सर्वांना भाजपा सांगणार का की हे परवाने सरेंडर करा आणि आजपासून दारू पिणं बंद करा", असा नवाब मलिक म्हणाले.

भाजपाचे लोकंच सर्वात जास्त दारूडे!

"महाराष्ट्रात सर्वात जास्त दारूच्या दुकानांचे परवाने आणि इतर दारूसंबंधीच्या गोष्टींमध्ये भाजपाच आघाडीवर आहे. मला तर असं वाटतं की महाराष्ट्रात भाजपाचेच लोक सर्वात जास्त दारूडे आहेत. भाजपचे विरोधी पक्षनेते म्हणतात की आम्ही महाराष्ट्राचं 'मद्यराष्ट्र' होऊ देणार नाही. मग मध्य प्रदेश पॉलिसी पाहता त्याचं नाव 'मद्य प्रदेश' ठेवायचं का? त्या राज्यात नवीन प्रकारची दारू बनवण्यास परवानगी देण्यात आली असून त्यावर उत्पादन शुल्कही लावण्यात आलेले नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांनी आधी त्याबद्दल बोलावं", असा सणसणीत टोला मलिकांनी भाजपाला लगावला.

टॅग्स :nawab malikनवाब मलिकBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस