शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

Navneet Rana got Discharge: उद्धव ठाकरे, हवा तो मतदारसंघ निवडा, माझ्याविरोधात जिंकून दाखवा; नवनीत राणांचे डिस्चार्ज मिळताच आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 12:09 IST

Navneet Rana big Announcement against Uddhav Thackeray: मी मुंबईची मुलगी आहे. मुंबईत दोन पिढ्यांपासून सत्ता आहे त्यांच्याविरोधात मी येत्या महापालिका निवडणुकीमध्ये प्रचार करणार आहे. मुंबईत जे रामभक्त आहेत त्यांच्या प्रचारासाठी मी उभी राहणार आहे, असे नवनीत राणा यांनी म्हटले आहे.

हनुमान चालिसा वाचणे जर गुन्हा असेल तर मी १४ वर्षे शिक्षा भोगण्यास तयार आहे. तरी देखील मी पुन्हा उभी राहीन. यापुढे माझा लढा सुरुच राहणार आहे. उद्धव ठाकरेंना माझे आव्हान आहे की त्यांनी माझ्याविरोधात कुठेही निवडणूक लढवून दाखवावी आणि जिंकून दाखवावे, असे आव्हान खासदार नवनीत राणा यांनी ठाकरेंना दिले आहे. राणा यांना आज लिलावती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. 

मी कोणता गुन्हा केला ज्याची मला शिक्षा मिळाली. क्रूर बुद्धीने महिलेवर, लोकप्रतिनिधीवर कारवाई करण्यात आली. केसवर मी बोलणार करणार नाही. माझ्यावर जो अन्याय झाला, तुरुंगात ते पोलीस ठाण्यात त्यावर मी लवकरच बोलणार आहे. डॉक्टरांनी अर्जंट चेकअप करण्याचे लिहून दिले होते. मी डॉक्टरांना रिक्वेस्ट करून ओपीडीद्वारे उपचार करणार आहे. डॉक्टरांना डिस्चार्ज द्यायचा नव्हता, असे नवनीत राणा म्हणाल्या. 

 एवढा अत्याचार केला, तुमच्याकडे ताकद आहे म्हणून. लोकांसमोर येऊन तुम्ही निवडणूक लढवून दाखवा. महिलेची ताकद काय आहे हे मी दाखवून देईन. त्यांनी माझ्याविरोधात निवडून येऊन दाखवावे. उद्धव ठाकरेंनी कोणताही  मतदारसंघ निवडावा, त्यांच्याविरोधात मी उभी राहणार आहे. महाराष्ट्राची जनता माझ्यावर झालेल्या अत्याचाराचे उत्तर देईल. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत मी पूर्ण ताकदीने लढा देणार आहे, असे शिवसेनेला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान दिले आहे. रामभक्तांचा मुंबईत प्रचार करणार

मी मुंबईची मुलगी आहे. मुंबईत दोन पिढ्यांपासून सत्ता आहे त्यांच्याविरोधात मी येत्या महापालिका निवडणुकीमध्ये प्रचार करणार आहे. मुंबईत जे रामभक्त आहेत त्यांच्या प्रचारासाठी मी उभी राहणार आहे. माझे घर जरी पाडले तरी रस्त्यावर राहून प्रचार करेन, असेही नवनीत राणा यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना