झारखंडच्या जनतेने मोदी-शहांचा अहंकार धुळीस मिळवला: नवाब मलिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 15:25 IST2019-12-23T15:23:05+5:302019-12-23T15:25:32+5:30
झारखंडमधील सत्ता कायम राखण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनी संपूर्ण ताकद लावली होती.

झारखंडच्या जनतेने मोदी-शहांचा अहंकार धुळीस मिळवला: नवाब मलिक
मुंबई: महाराष्ट्रापाठोपाठ आता भाजपानं झारखंडदेखील गमावलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांनी संपूर्ण ताकद पणाला लावूनदेखील भाजपावर पराभवाची नामुष्की ओढवली. तर झारखंडच्या जनतेने नरेंद्र मोदी, अमित शहांच्या अहंकाराचा चकनाचूर केला असल्याचा टोला राष्ट्रवादीचे नेते नवाब मलीक यांनी लगावला आहे.
झारखंडमधील सत्ता कायम राखण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनी संपूर्ण ताकद लावली होती. सुधारित नागरिकत्व कायदा आणून वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न भाजपानं करुन पाहिला. मात्र मोदी-शहांचे प्रयत्न वाया गेले. झारखंडमधील जनतेनं भाजपाला नाकारलं. महाराष्ट्रापाठोपाठ आता झारखंडदेखील भाजपाच्या हातातून निसटलं आहे. तर भाजपचा अहंकार धुळीस मिळाला असल्याचा म्हणत नवाब मलीक यांनी भाजपावर निशाणा साधला.
ट्विट करत नवाब मलिक यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. "झारखंडच्या जनतेने नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या अहंकाराचा चकनाचूर केल आहे. तर हा लोकशाहीचा विजय असल्याचे" सुद्धा मलीक म्हणाले आहे. झारखंडमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला असून राज्य भाजपाच्या हातून जाणार असल्याचं आकडेवारीतून दिसत आहे.