शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

"आम्ही पाठपुरावा करून मार्गी लावलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा नाट्य परिषदेचा केविलवाणा प्रयत्न.."

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 11:55 IST

राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या प्रदेश कार्याध्यक्षांचा आरोप

ठळक मुद्दे४४५ नाट्य संस्थांना नाट्य परिषदेकडून दिल्या जाणाऱ्या निधी वाटपावर आक्षेप

पुणे : ५९ व्या महाराष्ट्र हौशी राज्यनाट्य स्पर्धेतील सहभागी ४४५ नाट्य संस्थांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडून दिल्या जाणाऱ्या  निधी वाटपावर राष्ट्रवादी चित्रपट साहित्य सांस्कृतिक विभागानेच आक्षेप घेतला आहे. शासनाकडून या नाट्य संस्थाना अनुदान, निवास,प्रवास भत्ता, बक्षिसाची रक्कम, नाट्यगृह भाडे, तांत्रिक साहित्य भाडे आदी रक्कम देण्यास विलंब झाल्यामुळे राष्ट्रवादी चित्रपट साहित्य सांस्कृतिक विभागाने सतत पाठपुरावा करून आता तो प्रश्न मार्गी लागतोय हे कळताच याचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न नाट्यपरिषदेच्या कडून होत आहे ,असा आरोप राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केला आहे.         नाट्यपरिषद नियामक मंडळाच्या सदस्य ज्येष्ठ सिनेअभिनेत्री सविता मालपेकर यांनी देखील त्यास दुजोरा देत नाट्य परिषदेला घरचा आहेर दिला आहे.  राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग या प्रश्नांचा गेल्या ६ महिन्यापासून पाठपुरावा करत  आहे. ९ सप्टेबर रोजी राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने राज्य समन्वयक संतोष साखरे, मराठवाडा अध्यक्ष डॉ. सुधीर निकम, प्रदेश सरचिटणीस सविता मालपेकर, उपाध्यक्ष विजय पाटकर, सिनेअभिनेते सिद्धेश्वर झाडबुके,कौस्तुभ सावरकर, गिरीश परदेशी, बाळकृष्ण शिंदे, प्रियदर्शन जाधव माया जाधव, शाम राऊत आदीच्या शिष्टमंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेवून या विषयी त्यांना निवेदन देवून हौशी कलावंतांची ही अडचण विशद केली होती. त्यावर अजित पवार यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिल्याने शासकीय पातळीवर या प्रश्नाला वेग आला. या पाठपुराव्यामुळे आता काही दिवसात महाराष्ट्राच्या हौशी नाट्य संस्थांना त्यांच्या खात्यात त्यांची अनुदान रक्कम शासनाच्या वतीने दिली जाणार आहे. मात्र नाट्यपरिषदेने हे श्रेय स्वतःच्या नावे लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न चालवला आहे. तो त्यांनी तात्काळ थांबवावा. दरम्यान, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही......खिश्यात नाही दाणा अन बाजीराव म्हणा...     नाट्यपरिषदेकडे मदत करायला रक्कम नाही हे तेच सगळ्या जगाला सांगत होते. मग रक्कम होती तर पडद्यामागील कलावंतांना का मदत केली नाही.  एक कोटी २० लाख रुपयाच्या निधीतून कोणाला मदत केली? हे देखील नाट्यपरिषद त्यांच्या संचालकांना सांगायला तयार नाही. मग खिश्यात नाही दाणा अन बाजीराव म्हणा सारखी गत असताना चक्क ४४५ संस्थांना हे कशी काय मदत करणार? असा प्रश्न बाबासाहेब पाटील यांनी उपस्थित केला आहे......  

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसTheatreनाटकSharad Ponksheशरद पोंक्षे