राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या कारला अपघात, अहमदपूर-उदगीर मार्गावर ट्रकला धडकली कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 18:39 IST2017-10-01T18:38:36+5:302017-10-01T18:39:33+5:30
राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या कारला रविवारी सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास अहमदपूर-उदगीर रस्त्यावर अहमदपूर शहरानजिकच्या तात्या पेट्रोल पंपासमोर अपघात झाला.

राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या कारला अपघात, अहमदपूर-उदगीर मार्गावर ट्रकला धडकली कार
लातूर - राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या कारला रविवारी सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास अहमदपूर-उदगीर रस्त्यावर अहमदपूर शहरानजिकच्या तात्या पेट्रोल पंपासमोर अपघात झाला. समोरील ट्रक चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने कार (एमएच २४ एएन १००८) ट्रकला धडकली. त्यात कारचे नुकसान झाले असून, डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज सुखरुप आहेत.
उदगीर येथे आयोजित केलेल्या सत्संगात आशिर्वचन देण्यासाठी डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूर येथील वीर मठ संस्थान येथून रविवारी सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास निघाले होते. दरम्यान, कार अहमदपूर-उदगीर मार्गावरील तात्या पेट्रोल पंपाजवळ आल्यानंतर समोर असणाºया धावत्या ट्रक चालकाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे कार ट्रकला धडकली. या अपघातात कारचे नुकसान झाले आहे. डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज व त्यांचा कार चालक सुखरुप आहेत. दरम्यान, अपघातानंतर वीर मठ संस्थान अहमदपूर येथून दुसरी कार मागवून घेऊन ते उदगीरला सत्संगाला रवाना झाले. दरम्यान, या अपघाताबाबत पोलिसात मात्र नोंद नव्हती.