शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

राष्ट्रवादी प्रदेश कार्यकारिणीत जुन्याच चेहऱ्यांना पुन्हा संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 06:46 IST

तरुणांमध्ये असंतोष; नेत्यांनी जिल्हे वाटून घेतल्याची चर्चा, अजित पवार यांना मानणाऱ्या मोठ्या गटाला बाजूला ठेवल्याची भावना

- अतुल कुलकर्णीमुंबई : भाकरी फिरवली नाही तर करपून जाते, असे जाहीर सभांमधून उदाहरण देणाºया राष्टÑवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच नेमलेल्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जुन्या चेहºयांना घेऊन नवीन कार्यकारणी जाहीर केली आहे. त्यामुळे पक्षातील तरुणांमध्ये नाराजी उसळली आहे. शिवाय अजित पवार यांना मानणाºया एका मोठ्या गटाला यातून पद्धतशीरपणे बाजूला ठेवले गेले आहे.भाजपात जाणार अशी चर्चा असणाºया अनेक नेत्यांना नवीन कार्यकारिणी घेण्यात आले आहे. विदर्भाच्या काही जिल्ह्यांचा दौरा पूर्ण झाला असून बुथ कमिट्यांच्या माध्यमातून आतापर्यंत १७ ते १८ हजार कार्यकर्त्यांची नोंद झाली आहे, असे सांगण्यात आले. एवढी नोंदणी तर एका तालुक्यात भाजपाने केली आहे, मात्र आमचे नेते एवढ्या आकड्यावरही समाधानी आहेत, अशी खोचक टीकाही एका नाराज नेत्याने केली. जे लोक भाजपाच्या वाटेवर होते, त्यांना कार्यकारिणीत घेऊन गोंजारण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मात्र या संपूर्ण कार्यकारिणीत एकही नवीन युवा चेहरा घेण्यात आलेला नाही. भाकरी फिरवणे तर दूरच, ती आहे तेथून तसूभरही हलवली गेली नाही. राज्यात भाजपाविरुद्ध वातावरण तयार होत असताना आमचे नेते मात्र त्याच त्या पारंपरिक राजकारणात गुंतल्याचेही संबंधित नेता म्हणाला. जिल्हाध्यक्ष नेमतानाही अनेक जिल्ह्यात आहे त्यांनाच कायम ठेवले आहे.याच वागण्याला कंटाळून आपण राष्टÑवादी पक्ष सोडून काँग्रेसमध्ये आल्याचे डॉ. गजानन देसाई म्हणाले. आमच्याकडे डॉ. रवी बापट हापकीनमध्ये, सुधाकर परिचारक एसटी महामंडळावर, नकुल पाटील सिडकोवर, रत्नाकर महाजन नियोजन मंडळावर, सुभाष मयेकर सिध्दीविनायक ट्रस्टवर आणि अनेक जण मंत्री म्हणून किती वर्षे काम करत होते, याची यादी तपासा म्हणजे सत्य कळेल. पदांवर याच लोकांनी रहायचे आणि कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या हे किती दिवस करायचे म्हणून आपण व्यथित होऊन पक्ष सोडल्याचेही डॉ. देसाई म्हणाले.नवी मुंबईत नाईक, रायगडमध्ये तटकरे कुटुंबाचे वर्चस्वकार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर अस्वस्थ झालेल्या अनेक नेत्यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या. आमच्यातल्या अनेक नेत्यांनी सुभेदाºया दिल्याप्रमाणे एकेक जिल्हे वाटून घेतले आहेत. नवी मुंबईत गणेश नाईक, संजीव नाईक, संदीप नाईक, सागर नाईक, ज्ञानेश्वर नाईक तर रायगडमध्ये सुनील तटकरे, अनिल तटकरे, अवधूत तटकरे, आदिती तटकरे, अनिकेत तटकरे, उस्मानाबादेत पद्मसिंह पाटील, राणा जगजीतसिंह पाटील, जीवन गोरे, अनिल पाटोदेकर, राहूल मोटे तर नाशिक जिल्ह्यात छगन भुजबळ, समीर भुजबळ, पंकज भुजबळ अशी यादी किती जिल्ह्याची द्यावी असेही काहींनी सांगितले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार