शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Mohan Bhagwat: वाद करणे हा भारताचा स्वभाव नाही, सहकार्य- एकत्र चालण्याची संस्कृती- भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 09:31 IST

Mohan Bhagwat on Nationalism भारताची संस्कृती वाद-संघर्ष नव्हे, तर परस्पर मैत्री, सहकार्य आणि एकत्र चालण्यावर आधारित असल्याचे मोहन भागवत यांनी ठामपणे सांगितले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय राष्ट्र आणि पाश्चिमात्य नेशन या संकल्पनांतील फरक स्पष्ट करताना भारताची संस्कृती वाद-संघर्ष नव्हे, तर परस्पर मैत्री, सहकार्य आणि एकत्र चालण्यावर आधारित असल्याचे ठामपणे सांगितले. नागपूरच्या रेशीमबाग येथील राष्ट्रीय पुस्तक महोत्सवात ते बोलत होते.

मोहन भागवत म्हणाले की, "समाजात काम करत असताना अनेक लोक संघाला 'राष्ट्रवादी' म्हणतात, या मुद्द्यावर भागवत यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, 'राष्ट्र' आणि 'वाद' या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. आम्ही राष्ट्रीय आहोत, पण आम्ही कधीच वाद निर्माण करत नाही, कोणत्याही विवादात पडत नाही. वाद करणे किंवा संघर्ष करणे हा आपल्या देशाचा स्वभाव नाही. परंपरेपासून आपल्याकडे परस्पर मैत्री, सहकार्य आणि एकत्र चालण्याची संस्कृती आहे."

राष्ट्र आणि नेशन यांच्यातील या संकल्पनांतील फरक स्पष्ट करताना भागवत म्हणाले की, "परदेशातील राष्ट्रनिर्मितीत संघर्ष, संघर्षातून आलेली आक्रमकता आणि वर्चस्वाचा भाव दिसतो. पाश्चिमात्य नॅशनलिझममध्ये अहंकार असल्याने, याच विचारामुळे दोन महायुद्धे झाली. आपले राष्ट्र प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. ते केवळ सत्ता, सीमारेषा किंवा राजकीय व्यवस्था यांवर आधारित नाही. भारतीय राष्ट्र हे संस्कार, एकता आणि परोपकाराच्या भावनेवर उभे आहे. भारतीय राष्ट्रभाव एकतेतून जन्माला आला आहे, त्यात मी पणा नाही.  नेशन ही संकल्पना इंग्रजांनी आपल्यावर लादली आणि आपणही तेच शब्द वापरू लागलो. पण, आपले राष्ट्र हे केवळ नॅशनलिझम नसून ते राष्ट्रत्व आणि राष्ट्रभाव आहे", असेही मोहन भागवत यांनी स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Cooperation, not conflict, is India's nature: Mohan Bhagwat.

Web Summary : Mohan Bhagwat emphasized India's culture of cooperation, not conflict, differentiating it from Western nationalism's aggression. He highlighted India's ancient existence based on unity, values, and selfless service, contrasting it with the Western concept of nationhood rooted in power and borders.
टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्र