शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

National Inter-Religious Conference: ...म्हणून मला नितीन गडकरींचे 'वजन' कमी करायचेय; रामदेव बाबांनी केली स्तुती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 1:18 PM

Baba Ramdev talk about Nitin Gadkari, Vijay Darda in Nagpur: व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, लोकमत समुहाचे लोकमत’ एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह विविध धर्मांचे आचार्य उपस्थित होते. यावेळी रामदेव बाबांनी गडकरी आणि विजय दर्डा यांच्या वजनाचा धागा पकडला.

काही वर्षांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी (Nitin Gadkari) चर्चा झाली होती, हरिद्वारला जायला बराच वेळ लागतो. गडकरींनी हा रस्ता बनवत आमचा प्रवास 2.30 तासांचा केला, इंधन वाचविले. ते भारत भाग्यविधाता आहेत. गडकरींचे 20 किलो वजन कमी करायचे आहे. त्यांना देशासाठी आणखी 50 वर्षे जगायचे आहे, अशा शब्दांत योगगुरु आणि हरिद्वारच्या पतंजली योगपीठाचे संस्थापक रामदेव बाबा (Baba Ramdev) यांनी स्तुती केली. 

‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आज नागपुरात राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘धार्मिक सौहार्दाबाबत वैश्विक आव्हाने व भारताची भूमिका’ या विषयावर या परिषदेमध्ये विविध धर्मांच्या आचार्यांच्या उपस्थितीत महामंथन होत आहे. या परिषदेच्या माध्यमातून जगभरात धार्मिक सद‌्भावनेचा संदेश जाणार आहे. ( Lokmat National Inter-Religious Conference in Nagpur)

व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, लोकमत समुहाचे लोकमत’ एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह विविध धर्मांचे आचार्य उपस्थित होते. यावेळी रामदेव बाबांनी गडकरी आणि विजय दर्डा यांच्या वजनाचा धागा पकडला. दोघेही मला मोठ्या भावासारखे आहेत. नितीन गडकरी आणि विजय दर्डा यांच्यात मला स्पर्धा लावायची आहे. गडकरींचे 20 किलो वजन कमी करायचे आहे. त्यांना हरिद्वारला बोलविणार आहे. विजय दर्डा यांनी वजन कमी केलेले पुन्हा वाढविले. त्यांनाही बोलविणार आहे. तिथेच तुमच्यात स्पर्धा होईल, असे रामदेव बाबा म्हणाले. गडकरींना, दर्डांना आणखी पन्नास वर्षे देशासाठी जगायचे आहे. भारताला परम वैभवशाली बनविणार नाही, तोवर आम्हाला काम करायचे आहे, असेही रामदेव म्हणाले. 

विजय दर्डांचीही स्तुती, लोकमतला शुभेच्छा... विजय दर्डा हे कोणत्याही पक्षामध्ये असले तरी त्यांच्यासाठी राष्ट्रधर्म हा प्रथम आहे. 9-10 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अहमदाबादमध्ये त्यांनी असे भाषण केले होते की पुढचे दोन तीन दिवस चर्चेत होते. हा माणूस सर्वांसाठी बनलाय. हा माणूस देशासाठी बनलाय. लोकमत पुढे 100 वर्षे वाटचाल करणार. मी तेव्हा पुन्हा येणार आहे. मी आणखी 75 वर्षे जगणार आहे, अशा शब्दांत रामदेव बाबांनी लोकमत समुहाला शुभेच्छा दिल्या.  

टॅग्स :National Inter-Religious Conferenceराष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदBaba Ramdevरामदेव बाबाNitin Gadkariनितीन गडकरीVijay Dardaविजय दर्डा